Join us   

रोज सकाळी लवकर उठण्याचे ८ फायदे; नियम रोज पाळा, अलार्म न लावताच उठाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 1:05 PM

1 / 9
आजकाल बरेचसे आजार हे आपल्या लाईफस्टाईलमुळे उद्भवतात. गेल्या १० ते १५ वर्षात लाईफस्टाईलमध्ये बरेच बदल झाले आहेत. राहणीमान, जेवणाच्या वेळा, अशा सवयी आजारपणाचं कारण ठरत आहेत. आजकालच्या तरूणांमध्ये उशीरापर्यंत झोपण्याची सवय दिसून येते.
2 / 9
कोणतंही खास कारण असल्याशिवाय लोक लवकर उठायला मागत नाहीत. पण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटू शकतं. सकाळी लवकर उठल्यानं आजारांपासूनही लांब राहता येतं. सकाळी लवकर उठण्याचे फायदे समजून घेऊया.
3 / 9
सकाळी उशिरा उठल्यामुळे प्रत्येक कामात विलंब होतो. कधी ऑफिस तर कधी कॉलेजमध्ये तुम्ही उशीरा पोहोचता. यामुळे टिफिन घरीच राहतो. मग ऑफिसमध्ये कामाचं टेंशन असतं. या सर्व कारणांमुळे मेंदूवर दबाव येतो आणि ताण तणाव वाढतो
4 / 9
जर तुम्ही लवकर उठलात तर सर्व कामं वेळच्यावेळी आणि आरामात पूर्ण करू शकता. लवकर उठल्यानं शरीर ताजंतवानं आणि फ्रेश राहतं याशिवाय हार्मोन्सही नियंत्रणात राहतात. यामुळे नैराश्य टाळता येत आणि मानसिक आजारही नाहिसे होतात.
5 / 9
सकाळी लवकर उठण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यायामासाठी चांगला वेळ मिळतो. सकाळी वर्कआउट केल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. त्यामुळे दिवसभर ऊर्जा राहते. सकाळी केलेल्या व्यायामामुळे वजन झपाट्याने कमी होते.
6 / 9
अयोग्य जीवनशैलीमुळे हृदयविकार वाढत आहेत. अशा स्थितीत सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची सवय तुमच्या हृदयाला निरोगी ठेवते. याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहून हृदय निरोगी राहते.
7 / 9
सकाळी ताज्या हवेत श्वास घेतल्याने फुफ्फुस निरोगी राहतात. फुफ्फुस तंदुरुस्त ठेवण्यासाठी सकाळी मोकळ्या हवेत व्यायाम करा. सकाळी उठून उद्यानात किंवा कोणत्याही मोकळ्या जागेत जाताना दीर्घ आणि दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे ताजी हवा फुफ्फुसात जाईल आणि फुफ्फुसे निरोगी राहतील.
8 / 9
सकाळी लवकर उठण्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही दिवसाचे योग्य नियोजन करू शकता. यामुळे मेंदूवर दबाव राहत नाही, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. सकाळी लवकर उठल्याने ब्रेन हॅमरेजसारख्या अनेक आजारांचा धोका कमी होतो.
9 / 9
जे लोक सकाळी लवकर उठतात, त्यांची झोपही इतर लोकांपेक्षा चांगली असते. असे लोक रात्री लवकर झोपू लागतात. यामुळे तुमची त्वचा आणि एकूणच आरोग्य चांगले राहते.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य