कंबरेचा घेर दिवसेंदिवस वाढत चालला? ५ व्यायाम करा- काही दिवसांतच पोटावरचे टायर्स उतरतील By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2024 11:44 AM 1 / 7बैठ्या कामामुळे बऱ्याच जणांचे पोट सुटते. कंबरेचा घेर वाढतो. त्यामुळे मग हात- पाय बारीक असतात पण पोट आणि कंबर मात्र सुटलेली असते. 2 / 7यासाठी काही व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे. ते व्यायाम नेमके कोणते ते बघा. 3 / 7पहिला प्रकार म्हणजे क्रंचेस. यामध्ये पाठीवर झोपा आणि गुडघे दुमडून तळपाय शरीराच्या थोडे जवळ घ्या. दोन्ही हात मानेखाली ठेवा आणि डोक्याचा भाग उचला. यामुळे पोटावर ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होते. 4 / 7दुसरा व्यायाम आहे Leg raises Exercise. यामध्ये पाठीवर झोपा आणि दोन्ही पाय एका वेळेस उचलून सरळ रेषेत ठेवा. त्यानंतर जमिनीपासून ४५ डिग्री अंशावर ठेवा. दोन्ही प्रकारची स्थिती काही मिनिटांसाठी तशीच असू द्या. यामुळे पोटावर ताण येतो आणि कंबरेचा घेर कमी होण्यास फायदा होतो.5 / 7सायकलिंग एक्सरसाइज करण्यासाठी पाठीवर झोपा आणि दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे वर उचलून फिरवा. यामध्ये क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज अशा दोन्ही दिशेने पाय हलवावेत.6 / 7नौकासन नियमितपणे केल्यासही पोटावर ताण येतो आणि पोटावरची तसेच कंबरेवरची चरबी कमी होण्यास मदत होते.7 / 7प्लँक एक्सरसाईजचे वेगवेगळे प्रकारही पोटावरची तसेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आणखी वाचा Subscribe to Notifications