रात्री पाय दुखतात- पोटऱ्या ओढल्यासारख्या होतात? भाग्यश्री सांगते १ उपाय, थकवा जाऊन शांत झोप येईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2024 3:33 PM 1 / 6दिवसभर आपण भरपूर कामं, धावपळ करतो. तेव्हा गडबडीमध्ये आपलं शरीर काय सांगत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. पण रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यानंतर मात्र शरीर गळून गेल्यासारखं होतं.2 / 6पाय खूप दुखत असल्याची जाणीव होते. काही जणींना तर नेहमीच पाय ओढल्यासारखे होतात. पोटऱ्या दुखतात. कधीकधी तर त्यामुळे शांत झोपही लागत नाही. 3 / 6तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने एक खास व्यायाम सुचविला आहे. तो व्यायाम म्हणजे विपरित करणी. झोपण्याच्या आधी अंथरुणावर पडल्यापडल्या १० ते १५ मिनिटांसाठी हा व्यायाम करा. यामुळे इतरही कोणते फायदे होतात, याविषयीची माहिती तिने व्हिडिओद्वारे शेअर केली आहे.4 / 6भाग्यश्री सांगते विपरित करणी हा व्यायाम नियमितपणे केल्यामुळे शरीराचा थकवा कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.5 / 6ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही नियमितपणे विपरित करणी करणे फायद्याचे ठरते.6 / 6व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आता बराच वाढला आहे. हा त्रास कमी करण्यासाठीही विपरित करणी या व्यायामाचा उपयोग होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications