चरबीचे थर साचून दंड खूपच जाडजूड दिसतात? ५ व्यायाम करा- काही दिवसांतच हात दिसतील सुडौल
Updated:December 27, 2024 15:13 IST2024-12-27T15:08:43+5:302024-12-27T15:13:46+5:30

बऱ्याचजणींच्या बाबतीत असं होतं की दंडांवरची चरबी खूप वाढायला लागते. त्यामुळे मग हात अगदीच गुबगुबीत दिसू लागतात. अशावेळी मग अखूड बाह्यांचे किंवा स्लिव्हलेस ड्रेस घालायलाही नको वाटतं.(yoga poses that helps to reduce upper arm fat)
म्हणूनच दंडावरची चरबी कमी करण्यासाठी काही व्यायाम नियमितपणे करून पाहा. अगदी काही दिवसांतच दंडावरची चरबी कमी होऊन त्यांना अगदी छान आकार येईल. यापैकी सगळ्यात पहिला व्यायाम आहे चतुरंग दंडासन. यामुळे हातावर व्यवस्थित दाब येतो आणि दंडावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
प्लँक पोझ नियमितपणे केल्यास हातावरची चरबी तर कमी होतेच पण हातांच्या स्नायूंना बळकटीही मिळते.
प्लँक पोझ प्रमाणेच साईड प्लँक पोझ केल्यानेही दंडावरची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
डोल्फिन पोझ किंवा अर्ध पिंच मयुरासन केल्यामुळे हाताच्या स्नायूंवर योग्य तो ताण येऊन हातावरची वाढलेली चरबी कमी होते.
दंडांवरची चरबी कमी करून त्यांना योग्य तो आकार मिळवून देण्यासाठी काेब्रा पोझ म्हणजेच भुजंगासन करणेही फायदेशीर ठरते.