1 / 7बहुतांश महिलांच्या बाबतीत असं होतं की बाळंतपणानंतर त्यांचं पोट सुटतं. ते पोट पुन्हा कमी करण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. काही जणींचं बाकीचं शरीर व्यवस्थित प्रमाणात असतं. पण सुटलेल्या पोटामुळे मात्र फिगर पुर्णपणे बिघडून जाते.(best of 5 exercise for reducing belly fat)2 / 7म्हणूनच सुटलेलं पोट कमी करण्यासाठी हे काही व्यायाम करून पाहा (exercise to lose belly fat). पोट नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि काही दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल.(how to reduce belly fat?)3 / 7पहिला व्यायाम आहे दोरीवरच्या उड्या मारणे. या व्यायामामुळे पोट तर कमी होतेच पण हात आणि पायांच्या स्नायूंनाही बळकटी मिळते.4 / 7दुसरा व्यायाम आहे बर्पी (burpees). हा व्यायाम तुम्ही काही दिवस नियमितपणे करून पाहा. पोटावरची चरबी लगेच कमी झाल्यासारखी जाणवेल.5 / 7माउंटन क्लायंबर्स (mountain climbers) हा व्यायाम केल्याने पोटावरची चरबी तर कमी होईलच पण हृदयाच्या आरोग्यासाठीही हा व्यायाम अतिशय उपयुक्त मानला गेला आहे.6 / 7प्लँक आणि पुशअप्स असे दोन व्यायाम जर तुम्ही ठराविक प्रमाणात आणि ठराविक वेगात एकानंतर एक याप्रमाणे केले तरीही कॅलरी बर्न होऊन पोट कमी होण्यास खूप मदत होईल.7 / 7बायसिकल क्रंचेस (bicycle crunches) हा व्यायामही पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही दिवस नियमितपणे करून पाहा.