Join us   

ॲसिडीटीचा प्रचंड त्रास आहे, काहीही खा पित्त खवळतंच? करा ५ सोपी योगासनं, ॲसिडिटी विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 8:00 AM

1 / 8
१. कोणताही ऋतू असला तरी अनेक जणांना कधीही ॲसिडीटीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी ही ५ योगासनं नियमित करा आणि ॲसिडीटीचा त्रास कायमचा विसरा..
2 / 8
२. खाण्यात झालेला थोडासा बदलही अनेक जणांना सहन होत नाही. कधी छातीत जळजळ होते तर कधी पित्त वाढून डोकं दुखतं.. प्रत्येकाला होणारा ॲसिडीटीचा त्रास वेगवेगळा असला तरी तो वारंवार सहन करावा लागणं, खरोखरंच अतिशय कठीण.
3 / 8
३. म्हणूनच तर हा त्रास वारंवार होऊ नये, यासाठी ही काही योगासनं नियमित करा. नियमितपणे हे काही व्यायाम केले तर ॲसिडीटीचा त्रास तुमची कायमची पाठ सोडणार. हा उपाय इन्स्टाग्रामच्या az.yoga.and.more या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
4 / 8
४. ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी एक महत्त्वाचं योगासन म्हणजे वज्रासन. प्रत्येक सकाळी रिकाम्या पोटी तर वज्रासन कराच. पण त्यानंतरही दुपारच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर एखादा मिनिट वज्रासन घालून बसा. यामुळे पचन क्रिया सुधारते आणि ॲसिडीटीचा त्रास कमी होत जातो.
5 / 8
५. पवनमुक्तासन देखील अतिशय उपयुक्त आसन आहे. यामुळे केवळ ॲसिडीटीचा त्रासच कमी होत नाही, तर पचनाशी संबंधित वेगवेगळे त्रासही कमी होतात. हे आसन दररोज सकाळी रिकाम्यापोटी करावं.
6 / 8
६. पचनक्रिया आणि चयापचय क्रिया या दोन्ही क्रियांचं कार्य सुधारण्यास मदत करणारं आसन म्हणजे मलासन. मलासन दिवसांतून २ वेळा ४५ सेकंंदांसाठी करावं. स्त्रियांचा मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठीही हे आसन विशेष फायदेशीर ठरतं.
7 / 8
७. पश्चिमोत्तानासन- हे आसन करताना पोटावर विशेष दाब येतो जेणेकरून पचनक्रिया सुधारते. खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन झालं की आपोआपच ॲसिडीटीचा त्रास कमी होत जातो. हे आसन देखील दररोज सकाळी रिकाम्या पोटी करावं.
8 / 8
८. ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासोबतच मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी अर्ध मच्छिंद्रासन उपयुक्त आहे. दररोज सकाळी रिकाम्यापोटी साधारण ३० सेकंदासाठी हे आसन करा. दोन्ही बाजूंनी समान वेळेसाठी आसन करावे.
टॅग्स : योगासने प्रकार व फायदेव्यायाम