Join us   

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 7:25 PM

1 / 10
फोडणी म्हटलं की, तेलात आधी कडीपत्त्याची पानं पडतात (Curry Leaves). आणि मग इतर मसाले. कडीपत्ता घालताच पदार्थाची चव वाढते. कडीपत्त्याला विशेष चव आणि सुगंध आहे (Weight Loss). शिवाय याचे अनेक फायदेही आहेत(Curry Leaf Benefits: Want To Lose Weight? Add Kadi Patta in food).
2 / 10
यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यासह अँटिऑक्सिडंट्स असते. मुख्य म्हणजे वेट लॉससाठी आपण कडीपत्त्याची पानं खाऊ शकता. पण यामुळे वेट लॉस खरंच होते का?
3 / 10
कडीपत्ता कशा पद्धतीने खाल्ल्याने वेट लॉस मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो? पाहूयात.
4 / 10
लठ्ठपणा ही एक आरोग्य समस्या आहे. तसेच लठ्ठपणावर नियंत्रण न ठेवल्यास इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. लठ्ठपणामुळे रक्तदाबही वाढू शकतो. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
5 / 10
त्याचबरोबर लठ्ठपणामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून कडीपत्ता खाऊ शकता.
6 / 10
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण ५-६ कडीपत्त्याची पानं रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता. यामुळे पचनशक्ती सुधारू शकते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होईल.
7 / 10
जर आपल्याला कडीपत्त्याची पानं खायला आवडत नसेल तर, आपण कडीपत्त्याची चटणी करून खाऊ शकता. मुठभर कडीपत्त्याच्या पानांची चटणी तयार करा. सकाळी रिकाम्या पोटी खा, आणि नंतर थोडं पाणी प्या.
8 / 10
कडीपत्त्यात खरंतर, अँटिऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह संयुगे असतात. ज्यामुळे चयापचय बुस्ट होते. आणि वजनही घटते.
9 / 10
कडीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक आढळतात. यासह कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात.
10 / 10
यासह त्यात लोह देखील असते. ज्यामुळे कमकुवतपणा दूर होऊन, उर्जा वाढवण्यास मदत होते.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स