इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

Published:December 19, 2022 11:18 PM2022-12-19T23:18:33+5:302022-12-19T23:31:19+5:30

Fat Loss Exercise हिवाळ्यात जीम जायचं म्हटलं की लोकांना कंटाळा येतो, घरच्या घरी करा हे ७ वर्क आऊट, अतिरिक्त चरबी कमी करण्यास होईल मदत

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

वजन कमी करायचं म्हटलं की आपल्या डोक्यात आधी डाएट येतं, आणि मग व्यायाम. हिवाळ्यात बहुतांश लोकांना जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. आपल्याला जर घरच्या घरी व्यायाम करायचं असेल तर, नो-इक्विपमेंट एक्सरसाइज ट्राय करा. हे ७ एक्सरसाइज नियमित केल्याने तुम्ही फिट राहाल.

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

जर तुमचा उद्देश वजन कमी करायचा असेल तर, तुम्ही जिममध्ये तासनतास मेहनत केली पाहिजे असे नाही. वजन न उचलताही आपण अतिरिक्त चरबी कमी करू शकता. बर्पीज घरामध्येही करता येतात. हा व्यायाम नियमित केल्याने हृदय, फुफ्फुस आणि रक्त परिसंचरण सुधारते.

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

स्क्वॅट्स हा एक खुर्चीवर बसण्यासारखा व्यायाम आहे. ज्यामध्ये व्यक्ती आपले नितंब खाली करते आणि नंतर सरळ उभी राहते. खालच्या भागातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी स्क्वॅट्स हा एक चांगला व्यायाम आहे, यामुळे हाडे मजबूत होतात.

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

स्प्लिट लंज हा व्यायाम शरीरासाठी खूप प्रभावी आहे. यामध्ये पायावर उभे राहून नंतर उडी मारावी लागते. एकदा उजव्या पायाने उडी मारून पुढे जाल आणि डावा पाय मागे असेल, त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा डावा पाय पुढे असेल आणि उजवा पाय मागे असेल.

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

पुशअप्स जितके दिसायला सोपे आहे तितकेच करायला अवघड आहे. पुशअप्स करण्यापूर्वी, शरीर वॉर्म अप करा त्यानंतर हळूहळू शरीर खाली करा आणि हळू हळू वर आणा. हा व्यायाम विशेषत: शरीराच्या वरच्या भागावर काम करतो, याने शरीर मजबूत होते.

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

प्लँक हा व्यायाम करण्यास खूप अवघड आहे. हे करण्यासाठी तुम्हाला खूप ऊर्जा लागते. यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण शरीर तुमच्या हातांवर ठेवावे लागते आणि फळीच्या स्थितीत राहावे लागते. हा व्यायाम पोटाच्या स्नायूंवर सर्वात जास्त काम करते आणि आपली ताकद देखील वाढवते.

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर सायकल क्रंच हा उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी, आपल्याला झोपावे लागेल आणि आपले डोके वर करावे लागेल आणि आपल्या हातांनी आधार द्यावा लागेल. मग पाय सायकलप्रमाणे वर्तुळाकार हालचालीत चालवावे लागेल. हा एक उत्तम व्यायाम असून, याने शरीराचे अनेक स्नायू काम करतात.

इक्विपमेंट शिवाय व्यायाम करा; ७ एक्सरसाइज, फॅट लॉस होईल लवकर

बियर क्रॉल यामध्ये तुम्हाला अस्वलाप्रमाणे खाली झुकून चालावे लागेल. जेव्हा तुम्ही हात आणि पायांच्या मदतीने चालता तेव्हा शरीराच्या विविध स्नायूंवर परिणाम होतो आणि स्नायूंची शक्ती देखील वाढते.