Expert suggests 5 Do's for your weight loss journey, 5 Rules for weight loss
वजन कमी करायचंय ना? मग या ५ गोष्टी नियमितपणे करा... वजन घटविण्याचे ५ नियमPublished:September 15, 2022 07:02 PM2022-09-15T19:02:22+5:302022-09-15T19:16:57+5:30Join usJoin usNext १. वजन कमी तर करायचंय, पण त्यासाठी काय करावं हा अनेकांचा समोरचा प्रश्न. त्यासाठी कोणी व्यायाम करतं तर कोणी हेवी डाएटिंगचा मार्ग निवडतं. पण त्या कोणत्याही गोष्टीत सातत्य नसल्याने किंवा रोजच्या रुटीनमधल्या काही गोष्टी चुकत असल्याने वजन मात्र कमी होण्याचं नाव घेत नाही. २. अशा प्रकारच्या त्रासाने तुम्हीही त्रस्त असाल आणि वजन घटविण्यासाठी नेमकं काय करावं, हे कळत नसेल, तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या या टिप्स वाचा. याविषयीची माहिती त्यांनी नुकतीच एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे. ३. त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली आणि अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची भूक जेवढी आहे तेवढंच खा. कधी कधी एखादा पदार्थ खूप आवडतो म्हणून जास्तच खाल्ला जातो. किंवा कधी कधी वाया जाऊ नये म्हणून बळजबरी खाल्ला जातो. असं करणं टाळा. ४. व्यायामासाठी रोज थोडा तरी वेळ काढणं गरजेचं आहे. रोजचं व्यायामाचं रुटीन ठरवून घ्या आणि रोज सक्तीने थोडा तरी व्यायाम कराच. ५. रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे अतिशय गरजेचं आहे. यामुळे शरीरात हार्मोनल बॅलेन्स साधला जातो. हार्मोन्स जर संतुलित राहिले, तर वजन वाढ होत नाही. ६. वजन कमी करण्यासाठी जो काही उपाय कराल, त्यात सातत्य ठेवा. धरसोड वृत्ती टाळा. ७. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. मित्र परिवार, कुटूंब, प्रवास, काम या सगळ्यात आनंद शोधा. रिलॅक्स, आनंदी राहिल्याने वजन कमी होते, तर ताण घेत घेत जगल्याने वजन वाढते. ८. या काही गोष्टी नियमितपणे कराल तर नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल. टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सव्यायामवेट लॉस टिप्सFitness TipsHealth TipsExerciseWeight Loss Tips