Join us   

तज्ज्ञ सांगतात चालण्याचा व्यायाम करताना 'या' गोष्टींचं भान ठेवा, नाहीतर ४ आजारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 9:08 AM

1 / 6
वजन कमी करण्यासाठी किंवा एक व्यायामाचा भाग म्हणून अनेक जण नियमितपणे मॉर्निंग वॉकला जातात. ज्यांचं सकाळी जमत नाही ते संध्याकाळी किंवा रात्री जातात. पण चालण्याचा व्यायाम नियमितपणे करतात.
2 / 6
तुम्ही नियमितपणे मॉर्निंग वॉक करत असाल तर त्यामुळे आरोग्याला निश्चितच लाभ हाेतात. वजन कमी होण्यासही मदत होते. पण चालण्यात जर काही चुका तुमच्याकडून वारंवार होत गेल्या तर चालण्यामुळे फायदा तर सोडाच, पण आरोग्याला तोटेच अधिक होतील. ते नेमके कोणते पाहा..
3 / 6
याविषयी डाॅ. अनुज चावला यांनी दिलेली माहिती न्यूज१८ ने प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगतात की जर वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही रोजच गरजेपेक्षा जास्त चालत असाल तर त्यामुळे जांघेतले स्नायू तसेच पोटऱ्या आणि मांड्यांचे स्नायू दुखू शकतात.
4 / 6
चालताना तुमचं बॉडी पोश्चर चुकीचं असेल तर पाठदुखी आणि कंबरदुखी होऊ शकते.
5 / 6
तुम्ही चालण्याचा व्यायाम करत असताना जर चुकीच्या पद्धतीचे, चुकीच्या मापाचे बूट घालत असाल तर त्यामुळेही पाय, पाठ, कंबर दुखू शकते. त्यामुळे ज्याला चांगली ग्रीप असते, ज्याचा सोल उत्तम दर्जाचा असतो, असेच बूट वॉकिंगसाठी वापरावे.
6 / 6
तुम्ही कोणत्या रस्त्यावरून चालता हे देखील खूप महत्त्वाचे आहे. जास्त खडबडीत, कच्चा रस्ता असेल तर त्यावर चालू नका. सहसा ग्राऊंडवरच चालायला जाणे अधिक उत्तम.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स