नव्या वर्षात व्यायामाचा संकल्प? ५ योगासनांपासून सुरुवात करा, अंशुका परवानी यांच्या खास फिटनेस टिप्स... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2023 8:13 AM 1 / 8१. वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण व्यायामाचा संकल्प करतात. सुरुवातीला उत्साहाच्या भरात अनेक अवघड व्यायाम प्रकार निवडतात. एरवी शरीराला व्यायामाची सवय नसते. अशावेळी जर जास्तीचा व्यायाम केला तर मग अंगदुखी सुरू होते.2 / 8२. अंगदुखीमुळे मग व्यायामाचा कंटाळा येतो आणि मग सगळा व्यायामच बंद होऊन जातो. वर्षभरासाठी केलेला संकल्प मग अवघा महिनाभरही टिकत नाही. तुमचंही असंच होऊ नये म्हणून सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी दिलेला हा खास सल्ला एकदा वाचाच..3 / 8३. शरीराला त्रास होऊ नये, म्हणून कोणत्या योगासनांपासून तुमचा योगप्रवास सुरू करावा, याविषयीची एक पोस्ट त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली असून यात ५ योगासनं सुचवली आहेत. 4 / 8४. सगळ्यात पहिलं म्हणजे पर्वतासन किंवा Mountain Pose. यामुळे बॉडी पोश्चर सुधारून शरीरातील रक्ताभिसरण उत्तम पद्धतीने होण्यास मदत होते.5 / 8५. दुसरं आसन म्हणजे वृक्षासन Tree Pose. यामुळे पायाच्या स्नायूंना ताकद मिळते, एकाग्रता वाढते. 6 / 8६. तिसरं आसन म्हणजे मार्जरासन Cat Cow Pose. यामुळे पाठीच्या कण्याचा चांगला व्यायाम होतो. मानेचे स्नायू मजबूत होतात तसेच स्ट्रेस घालविण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरते.7 / 8७. नियमितपणे मलासन Garland Pose केल्यामुळे पचनक्रिया चांगली होते. तसेच महिलांचे मासिक पाळीतले अनेक त्रासही कमी होतात.8 / 8 ८. बटरफ्लाय Butterfly Pose या आसनामुळे मांडीवरची चरबी कमी होण्यासाठी मदत होते. पेल्व्हिक एरिया आणि गुडघ्यांची ताकद वाढण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications