Join us   

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 9:29 AM

1 / 8
रोजच्या आहारात व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचे सेवन केल्यानं शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यास मदत होते. व्हिटामीन बी-१२ साठी नेहमीच नॉनव्हेज खायला हवे असं काही नाही आहारात काही शाकाहारी पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढू शकता. ( What To Eat For Vitamin B-12 Best Foods For Vitamin B-12)
2 / 8
शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा येणं, अशक्तपणा, झोप न लागणं अशा समस्या उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा.
3 / 8
सोया प्रोडक्ट्समधून व्हिटामीन-१२ मिळते. आहारात सोयाबीन, सोया मिल्क अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.
4 / 8
दूध किंवा दह्याचे सेवन करा. दूध किंवा दही खाल्ल्याने शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासत नाही.
5 / 8
ओट्सच्या सेवनाने व्हिटामीन बी-१२ कमतरता दूर होण्यास मदत होते. मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करा.
6 / 8
फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. फळांचे सेवन केल्याने व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.
7 / 8
बीटरूटच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. बीटरूट पराठा, बीटाचा ज्यूस या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
8 / 8
पालक, केल, कडधान्य या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स