Health Tips: 'या' वेळेत वजन कराल तर वाढलेलंच दिसेल; जाणून घ्या वजन तपासण्याची योग्य वेळ! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2024 12:14 PM 1 / 8आहार तज्ज्ञ आणि वेट लॉस ट्रेनर सांगतात, लोक व्यायाम केल्या केल्या भरपूर घाम निघालेला पाहून फार आशेने वजन काट्यावर उभे राहतात. त्यांना वाटते, जेवढा घाम निघाला तेवढे वजन कमी, मात्र तो आपला गैरसमज असून वजन तपासण्याची ती अयोग्य वेळ असते. मग नेमके कधी वजन तपासले तर ते अचूक दर्शवेल? तज्ज्ञ मंडळींनी केलेले मार्गदर्शन पाहू. 2 / 8आपला आहार, विहार, झोप आणि एकूणच दिनचर्या यानुसार आपल्या वजनात चढ उतार होत असतात. सकाळी दिसलेला वजनाचा आकडा संध्याकाळी सारखा असेलच असे नाही. विशेषतः कोणत्याही प्रकारचा व्यायाम वा अति शारीरिक कष्ट केल्यानंतर वजन तपासणे तर पूर्णपणे गैर ठरते. वजन तपासताना आपण पुढे दिलेल्या पाच चुका करतो आणि हताश होतो. त्या चुका टाळूया आणि योग्य वेळ जाणून घेऊया. 3 / 8जेवण झाल्यावर आपले पोट आपल्याला जड वाटू लागते. ते वजन केवळ अन्नाचे नाहीतर त्याबरोबर पाण्याचेही असते. त्यामुळे वजनात कमी-अधिक बदल होतात. ते आपले योग्य वजन आहे असे समजणे चुकीचे ठरेल. 4 / 8अनेकांना उशिरा जेवण्याची सवय असते. त्यांनी तर रात्री वजन तपासूच नये. शिवाय जे लोक संध्याकाळी ७ च्या आधी जेवतात, त्यांनीही रात्री वजन तपासू नये. लवकर जेवल्यामुळे झोपेपर्यंत पोट हलके राहते, पण अन्नाचे पाणी होऊन वजनात बदल होतो, त्यामुळे झोपण्यापूर्वीची वेळ वजन तपासण्यासाठी योग्य वेळ नाही. 5 / 8वर म्हटल्याप्रमाणे व्यायामानंतर घाम जरी निघत असला तरी स्नायूंना बळकटी मिळून त्यात तात्पुरता बदल होऊन स्नायूंचे वजन वाढलेले असते, त्यामुळे व्यायामानंतर तास-दोन तास तरी वजन तपासू नये. 6 / 8काही लोक एवढे हेल्थ कॉन्शस असतात की प्रत्येक गोष्ट मोजून मापून खातात आणि खाल्ल्यावर वजन तपासत राहतात. त्यामुळे वजनात प्राणा, तर होत नाहीच, शिवाय दर वेळी वजन काटा पुढे मागे झालेलाच दिसतो. 7 / 8वजन तपासण्याची योग्य वेळ असते सकाळची! जेव्हा तुम्ही तुमचे प्रातर्विधी उरकून घेता, तेव्हा पोट रिकामे झालेले असते. पाण्याचा थेंबही न घेता, न खाता जेव्हा तुम्ही वजन तपासता, तेव्हा तुम्हाला तुमचे अचूक वजन कळते. 8 / 8वजन संतुलित असावे हे मान्य, मात्र याचा अर्थ सगळेच बारीक लोक निरोगी असतात असे नाही किंवा सगळेच जाड लोक रोगी असतात असेही नाही. वजन आणि आरोग्य या परस्परावलंबी गोष्टी आहेत. मात्र आपली उंची, वजन आणि दैनंदिन कामे, आहार यावरही आपले आरोग्य अवलंबून असते हे लक्षात ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications