काहीही खा सहज पचेल, वजनही वाढणार नाही; जेवणानंतर फक्त 'हे' एकच काम करा.. By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:08 PM 1 / 8शरीर निरोगी, तंदरूस्त ठेवण्यासाठी खाण्यापिण्याबरोबरच इतर काही गोष्टी महत्वाच्या असतात. निष्काळजीपणामुळे वाढत्या वयात वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. जेवल्यानंतर थेट झोपू नये असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जेवल्यानंतर काय केल्यानं आजारांपासून लांब राहता येतं. कधी आपण जास्त जेवतो तर कधी जेवण बाहेर पदार्थ खाण्यात येतात त्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटतं. (Things to do after eating a large meal)2 / 8तुम्ही सकाळी जेवा किंवा रात्री. जेवल्यानंतर चालायला जाणं खूप महत्वाचं आहे. चालल्यानं शरीराला कमालीचे फायदे मिळतात. अनेक संशोधनातून हे समोर आलं की नियमित चालल्यानं गंभीर आजार दूर होण्यास मदत होते. रोज चालण्याची सवय ठेवल्यानं गॅस, टाईप २ डायबिटीस, कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा दूर राहतो.3 / 8बद्धकोष्ठता, टाइप 2 मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा हे आजार आहेत जे दीर्घकाळ टिकून राहतात. एकदा ते आले की, त्यांच्यावर पूर्णपणे उपचार करता येत नाहीत. हे रोग केवळ औषधे घेऊनच नियंत्रित किंवा नियंत्रित केले जाऊ शकतात.4 / 8जेवल्यानंतर लगेच खूप जास्त चालू नका. संशोधनानुसार असे केल्याने अपचन, जुलाब, मळमळ, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे चालणे सुरक्षित आहे. अशा वेळी चालल्याने पचनक्रिया जलद होण्यास मदत होते.5 / 8जेवल्यानंतर वेगानं चालणं टाळा. संथगतीनं चालावं. चालताना दम लागणार नाही, श्वास घ्यायला त्रास होणार नाही. याची काळजी घ्या.6 / 8संशोधनानुसार सुरूवातीला जेवणानंतर फक्त 10 मिनिटे चालावे. मग स्टॅमिना नुसार रोज वेळ वाढवता येईल. 7 / 8रोज चालल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 8 / 8 शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी करण्यासही मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications