सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

Published:December 27, 2023 02:49 PM2023-12-27T14:49:47+5:302023-12-27T14:56:15+5:30

Here's the diet that Salman Khan follows to stay fit : सलमान खानचा वाढदिवस, वयाच्या ५८ व्या वर्षीही ‘हिरो’ असलेल्या सलमानचं डाएट ही वेगळं आहे.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

'ओ ओ जाने जाना' या गाण्यातून फिटनेस ट्रेण्ड (Fitness Trend) सुरु करणारा भाईजान सलमान खान आज ५८ वर्षांचा झाला. तो कायम फिट अँड फाईन दिसतो. आपण पाहिलंच असेल त्याच्या अनेक चित्रपटात त्याने शर्टलेस सीन देऊन चित्रपटाला चारचांद लावले आहे. पण वयाच्या ५८ वर्षीही इतकं फिट राहणं सलमानला जमतं कसं? त्याची ही फिट बॉडी पाहून भारतात अनेकांनी जिम जॉईन केली (Salman Khan). आज सलमानचा ५८वा वाढदिवस. या वयातही फिट राहण्यासाठी सलमान कोणता डाएट रुटीन फॉलो करतो? त्याच्या चमकदार चेहऱ्यामागचं रहस्य काय? पाहूयात(Here's the diet that Salman Khan follows to stay fit).

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

सलमान आपल्या फिटनेस रुटीनमध्ये ५ गोल्डन रुल्स फॉलो करतो. या ५ गोल्डन रुल्समुळे सलमान कायम फिट आणि यंग दिसतो. जर आपल्यालाही फिट आणि यंग दिसायचं असेल तर, हेल्दी लाईफस्टाईलमध्ये या ५ गोल्डन रुल्सचा समावेश करा.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

सलमान कायम आपल्याला कार्डीओ करताना दिसतो. जसे की सायकलिंग, रनिंग यासह स्ट्रेन्थ ट्रेनिंग घेऊन त्याने पिळदार बॉडी तयार केली आहे. आठवड्यातील ३ दिवस किमान १५० किंवा ७५ मिनिटे तो एरोबिक एक्सरसाइज करतो.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

सलमान खान कायम बॅलेंस्ड डाएट फॉलो करतो. त्याच्या डाएटमध्ये फळे, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ, यासह हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांचा समावेश असतो. या डाएटमुळे त्याला पिळदार बॉडी तयार करण्यास मदत मिळते. शिवाय इतर आजारही छळत नाही.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

सलमान खान इंटरमिटेण्ट फास्टिंग फॉलो करतो. ज्यामुळे त्याला फिट शरीर मिळवण्यास मदत मिळते. यासाठी तो १६ : ८ या इंटरमिटेण्ट फास्टिंग डाएट पॅटर्न फॉलो करतो.. याच्यामध्ये सलमान इतर पदार्थ खाण्यास टाळतो. शिवाय तो काटेकोरपणे आपल्या डाएटला फॉलो करतो.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

स्ट्रेन्थ वर्कआउटव्यतिरिक्त मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी सलमान योगा आणि मेडीटेशन करतो. कारण त्याच्या मते, मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे. योगा आणि मेडीटेशन केल्याने कामातला फोकस वाढतो.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

सलमान सेटवर कायम एनर्जेटिक राहतो, असे त्याच्या को-स्टार्सचं म्हणणं आहे. सलमान हाय इंटेण्सिटी इंटरव्हल ट्रेनिंगला फॉलो करतो. हा वर्कआउट अतिशय वेगवान पद्धतीने केला जातो. यामुळे शरीर मजबूत होते, शिवाय शारीरिक क्षमता वाढवण्यास मदत मिळते. यामुळे सलमान कायम एनर्जेटिक दिसतो.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

सलमानला तब्बल सहा वर्ष ट्रेनिंग देणारे फिटनेस कोच मनीष अडविळकर सांगतात, 'सलमान दिवसाला १,००० पुश-अप, २,००० सिट-अप आणि ५०० क्रंचेस असा व्यायाम करतात. शिवाय फिटनेसबद्दल त्यांची निष्ठा, शिस्त आणि प्रेम हे त्यांना फिट राहण्यास मदत करतात.'