ब्रेस्ट कॅन्सरची ट्रिटमेंट सुरु असतानाही हिना खान करतेय कसून व्यायाम, ते पाहूनच चाहते म्हणाले... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 9:06 AM 1 / 5आपल्याला माहितीच आहे की अभिनेत्री हिना खानला काही दिवसांपुर्वीच ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं असून ती सध्या त्याचे उपचार घेत आहे. पण असं असलं तरी तिच्या व्यायामात मात्र अजिबात खंड पडलेला नाही.2 / 5कॅन्सरचं निदान झाल्यापासून हिना जास्तीतजास्त पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या आजाराला आणि त्यावर घेत असलेल्या उपचाराना ती अगदी हसून सामाेरी जात आहे. हे खरंतर तिच्यासारख्या कॅन्सरशी झूंड देणाऱ्या प्रत्येकासाठीच खूपच प्रेरणादायी आहे. 3 / 5आता पुन्हा एकदा हिनाने तिच्या चाहत्यांना आणि वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेत असलेल्या प्रत्येकालाचा एक नवी प्रेरणा दिली आहे. आजार झाला म्हणून हात- पाय गाळून बसून नका. उलट तुमचा फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करा, व्यायाम करा असा संदेशच तिने जणू दिला आहे.4 / 5जिममध्ये जाऊन व्यायाम करतानाचे फोटो- व्हिडिओ मिडियावर व्हायरल झाले असून ते पाहूनच तिचे चाहते तिचं तोंडभरून कौतूक करत आहेत. तिच्या जिद्दीला आणि तिच्या पॉझिटीव्ह ॲटिट्यूटला मनापासून सलाम करत आहेत.5 / 5'Most Strongest and Bravest girl', 'Inspiration for many' अशा शब्दांत चाहते तिचं कौतूक करत आहेत. व्हिडिओमध्ये ती पुशअप्स, स्क्वॅट्स, वेटलिफ्टिंग अशा प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications