वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

Published:April 25, 2023 05:06 PM2023-04-25T17:06:53+5:302023-04-26T09:08:38+5:30

How to eat white rice to lose weight : तांदूळ उकळत्या पाण्यात टाकावा आणि जास्तीचे पाणी काढून टाकावे, त्यामुळे धान्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाते

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

वजन कमी करण्यासाठी काहीजण भात खाणं पूर्ण बंद करतात तर काहीजण चपाती कमी खातात. वजन कमी करायचं असेल किंवा पोटाचा घेर कमी करायचा असेल तर भात खाणं सोडावं लागतं असा समज लोकांच्या मनात आहे. पण आहारतज्ज्ञांच्यामते तुम्ही चांगला आहार घेऊनही वजन कमी करू शकता. तांदळात फॅट्सचे प्रमाण कमी असते. तांदूळ हे ग्लूटेन फ्री असतात. ज्यात व्हिटामीन्सही असतात. पांढरे तांदूळ घालून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ( Best way to cook rice for weight loss)

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

फक्त एकवेळच्या जेवणातच पांढरा भात घ्या. यामुळे अन्नातील कॅलरीज वाढणार नाहीत. याशिवाय तुम्ही कोणताही आहार घेत असाल, जर तो कमी कार्बोहायड्रेट आहार असेल तर त्यानुसार भात खा आणि जेवणातून उर्वरित कार्ब्स कमी करा.

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

इतर कार्ब्सच्या तुलनेत भात खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते. यामुळे तुमचं फूड इंटेक वाढते. म्हणूनच भाताबरोबर ब्रोकोली, बीन्स, चिकन ब्रेस्ट खा. यात फायबर्स आणि प्रोटीन्सही असतात.

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

नियती नाईक (क्लिनिकल डाएटिशियन) सांगतात की, तांदूळ उकळत्या पाण्यात टाकावा आणि जास्तीचे पाणी काढून टाकावे, त्यामुळे धान्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाते.

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

या पद्धतीमध्ये पाण्यात विरघळू शकणारी जीवनसत्वे देखील निघून जातात. त्यामुळे भात खायला घेण्याच्या काही तास आधी शिजवावा व थंड होऊ द्यावा. यामुळे भातामध्ये रेजिस्टन्स स्टार्च तयार होते.

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

शरीरात पोटासाठी चांगले बॅक्टेरिया वाढीस चालना मिळते. अशाप्रकारे रक्तातील शर्करा स्तराचे संतुलन अधिक चांगल्या पद्धतीने होते

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

बैठ्या जीवनशैलीमुळे, अव्यवस्थित पचनामुळे होणारे आजार टाळले जातात व वजन देखील नियंत्रणात राहते.

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

(कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)