बारीक व्हायचयं पण व्यायाम आवडत नाही? झरझर वजन घटवतील हे ४ हॅक्स, मेंटेन, सुडौल दिसाल
Updated:January 2, 2023 19:58 IST2023-01-02T19:51:57+5:302023-01-02T19:58:12+5:30
How to lose weight without exercise : वजन कमी करण्यासाठी, प्रक्रिया केलेले अन्न टाळणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे

आपलं वजन नियंत्रणात राहावं. आपण जास्त लठ्ठ दिसू नये यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. डाएटिंगच्या नावाखाली तासनतास लोक उपाशी राहतात. (Weight Loss Tips) फिट राहवं हे सध्याच्या काळात खूप मोठं आव्हान बनलंय. वजन कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या टिप्सचा वापर करून तुम्ही डायटिंग न करताच वजन कमी करू शकता.
कॅलरिज काऊंट ठेवा
वजन कमी करण्यासाठी डाएटिंगपेक्षाही कॅलरी काऊंट ठेवणं महत्वाचं असतं. लो कार्ब हाय प्रोटीन पदार्थांचा आहारात समावेश करा. डाएटसाठी कार्ब्स खाणं बंद करण्याची अजिबात गरज नाही. व्यायाम करण्याआधी उर्जेसाठी तुम्ही गूड कार्ब्सचा समावेश आहारात करू शकता.
जीमला जायला वेळ नसेल इतर एक्टिव्हीज करा
जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर जास्त कॅलरी बर्न होऊन तुमचे वजन कमी होऊ शकते. पण जर व्यायामाचा तुम्हाला कंटाळा येत असेल तुम्ही चालणे, पोहणे असे व्यायाम करू दररोज 8,000-12,000 पावले चालणे केवळ कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकत नाही तर संपूर्ण आरोग्य सुधारू शकते. यामुळे फक्त वजन नियंत्रणात राहत नाही तर हृदयाचे आजार, मधुमेह या आजारांपासून सुटका होते.
चांगली झोप घ्या
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमची झोप चांगली असणे आवश्यक आहे जेणेकरून स्नायूंची पुनर्प्राप्ती योग्यरित्या करता येईल. जर तुम्ही दररोज रात्री 7.5 तासांपेक्षा जास्त झोपाल तर ते चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देईल. यामुळे तुमचं चयापचन देखिल सुधारेल.
प्रोसेस्ड फूड खाऊ नका
वजन कमी करण्यासाठी, प्रक्रिया केलेले अन्न टाळणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे.
सामान्य अन्नाच्या तुलनेत पॅकबंद अन्नामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. याशिवाय अन्न चावून व्यवस्थित खा, घाई घाईत खाऊ नका.