रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 9:04 AM 1 / 7काही जणींच्या पोटऱ्या खूप दुखतात. दिवसा तर त्या दुखतातच, पण दिवसभर आपण कामामध्ये बिझी असल्याने ते दुखणं जाणवत नाही. पण रात्रीच्या वेळी मात्र त्या भयंकर त्रास देतात. (how to reduce pain in calf muscle?)2 / 7काही जणींचं हे दुखणं एवढं जास्त असतं की त्या अक्षरश: पायाला ओढणी बांधून झोपतात. तुमचंही असंच असेल तर पोटऱ्या एवढ्या जास्त का दुखतात आणि त्यावर काय उपाय करावे ते पाहा.. याविषयीची सगळी माहिती tanviherbals_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (home remedies and simple exercises for reducing leg pain)3 / 7पोटऱ्या दुखत असतील तर त्यामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, हे एक महत्त्वाचं कारण असतं. त्यामुळे त्या भागातला रक्तपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कोमट तेलाने पोटऱ्यांना नियमितपणे मालिश करा. (reasons for calves muscle pain)4 / 7पाणी कमी पित असाल तरीही पोटऱ्यांमध्ये गोळा येतो. त्या ओढल्यासारख्या वाटतात. त्यामुळे पाणी व्यवस्थित पित आहात ना, ते एकदा तपासून घ्या.5 / 7ताडासन नियमितपणे केल्यामुळे पोटऱ्यांचे स्नायू ताणले जातात आणि तिथल्या वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते.6 / 7रोज रात्री झोपण्यापुर्वी विपरीत करणी हे आसन केल्यास पोटऱ्यांचं दुखणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं.7 / 7पोटऱ्यांच्या स्नायुंचं भरपूर स्ट्रेचिंग होईल असे व्यायाम करा. यामुळे त्या भागातला रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि वेदना कमी होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications