Join us   

व्यायाम करायला वेळ नाही? तातडीने आहार बदला, ५ टिप्स- व्यायाम न करताही राहाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 8:10 AM

1 / 8
१. फिट तर सगळ्यांनाच रहायचं असतं. पण फिटनेस राहण्यासाठी गरजेचा असणारा व्यायाम करण्याची अनेकांची तयारी नसते. व्यायाम करणं अनेकांसाठी जाम कंटाळवाणं असतं. त्यामुळे ते व्यायाम टाळण्यासाठी कायम बहाणा देत असतात.
2 / 8
२. दुसरे लोक असेही असतात की ज्यांना व्यायामासाठी थोडासा वेळ काढणंही खरोखरंच अवघड असतं. पण फिटनेस टिकविण्यासाठी व्यायामाशिवाय दुसरं जे काही शक्य होईल, ते करण्याची जाम इच्छा असते.
3 / 8
३. अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी या काही टिप्स अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. व्यायाम न करताही फिट कसं रहायचं, याचे उपाय इन्स्टाग्रामच्या gunjanshoutsandimwow.in या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.
4 / 8
४. यामध्ये सांगितलेला पहिला उपाय म्हणजे आहारात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात ठेवा. प्रोटीन्स योग्य प्रमाणात असले तर स्नायू मजबूत होण्यास फायदा होतो.
5 / 8
५. प्रोटीन्सबरोबर फायबरही योग्य प्रमाणात असावेत. आहारात फायबर योग्य प्रमाणात असले तर कॅलरीचा इनटेक आपोआपच मर्यादित होऊन जातो.
6 / 8
६. कोणत्याही गोष्टीचा ताण येणार नाही, याचा प्रयत्न करा. तसेच रात्री ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. यामुळे शरीरातील हंगर हार्मोन्स संतुलित राहतात आणि यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते.
7 / 8
७. दिवसभरातून पुरेसं पाणी प्या. पाणी योग्य प्रमाणात जर पोटात गेलं तर शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. चयापचय आणि पचनक्रिया चांगली होते. त्यामुळे अनेक समस्या सुटतात.
8 / 8
८. सतत ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. व्यायाम शक्य होत नसेल तर चालणे, घरातली कामे करणे किंवा इतर अशी कामे करा जेणेकरून पुरेशी शारिरीक हालचाल होईल.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्स