ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

Published:November 24, 2022 02:39 PM2022-11-24T14:39:18+5:302022-11-24T14:58:21+5:30

How to Stay Fit Without Exercise : दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हे लठ्ठपणा टाळते आणि त्वचा चमकदार बनवते

ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

फिट राहण्यासाठी नेहमीच नियमितपणे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकांना रोजच्या कामाच्या गडबडीत व्यायाम करायला वेळ मिळत नाही. खाण्यापिण्याच्या वेळा चुकतात त्यामुळे डाएटही व्यवस्थित होत नाही. रोजच्या जगण्यात काही बदल करून तुम्ही वर्कआऊट केल्याप्रमाणे फायदे मिळवू शकता. (How to Stay Fit Without Exercise)

ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

ज्यांच्याकडे व्यायाम करायला अजिबात वेळ नसतो अशा लोकांसाठी या सवयी फायदेशीर ठरतील. पण जर तुम्ही व्यायामसाठी वेळ काढू शकत असाल तर त्याकडेही लक्ष द्यायला हवं. (Good habits that keep you fit and healthy without exercise or workout)

ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

ताण तणाव कमी करून मूड चांगला ठेवण्यासाठी तुम्ही संगीत ऐका. यामुळे हॅप्पी हॉर्मोन डोपामाईनचे उत्पादन वाढेल. तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी रोज गाणी ऐका.

ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

फिट राहण्यासाठी शारीरिकदृष्या सक्रिय असणं महत्वाचं असते. तुम्ही रोज डान्स करणं, चालायला जाणं, सायकल चालवणं या एक्टिव्हीज करू शकता.

ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

चांगली झोप थकवा, नैराश्य, मानसिक विकार टाळते. अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक चांगले झोपत नाहीत त्यांना मानसिक समस्या होण्याची शक्यता 5 पट जास्त असते. दररोज 7-8 तास झोप घेतल्याने मूड सुधारतो आणि ऊर्जा टिकून राहते.

ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हे लठ्ठपणा टाळते आणि त्वचा चमकदार बनवते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मूड खराब होतो आणि मेंदूचे कार्य मंदावते. पुरेसे पाणी प्यायल्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो आणि डोपामाइन आणि सेरोटोनिनचे उत्पादन वाढते.

ना व्यायाम ना डाएट तरी राहाल मेण्टेन, फक्त ५ सवयी; वजन वाढणारच नाही, राहाल फिट

व्यायाम करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपले चुकीचे खाणे. पण तुम्ही हेल्दी डाएट घेऊन वर्कआउट टाळू शकता. तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळे, संपूर्ण धान्य, भाज्या आणि काजू यांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला भरपूर अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. सकस आहार मानसिक आरोग्यासाठीही चांगला आहे.