Join us   

पन्नाशीतही करिश्मा दिसते फिट, ती म्हणते बिर्याणी - पनीर खूप आवडते पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2023 12:44 PM

1 / 10
९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री लोलो अर्थात करिश्मा कपूर (Karishma Kapoor) ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ती सध्या बॉलीवूडपासून दूर जरी असली तरी, ती आपल्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. करिश्माने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करिश्माच्या सौंदर्य आणि अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. या वयात देखील ती स्वतःला फिट - मेन्टेन ठेवते. ती सोशल मिडीयावर फार सक्रीय असते. ती नेहमी आपले नव-नवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांसह कनेक्ट राहते(This is how Karisma Kapoor keeps herself fit at the age of 50, Know more about it...).
2 / 10
करिश्मा अतिशय साधी जीवनशैली जगते. ती कोणतीही भारी वर्कआउट करत नाही. किंवा एक्‍स्‍ट्रीम डाएटला फॉलो करत नाही. ती या वयात देखील तरुण आणि फिट कशी दिसते, ती आपल्या डाएटमध्ये नेमकं काय - काय खाते? हे पाहूयात.
3 / 10
पंजाबी कुटुंबात वाढलेल्या करिश्माला विविध पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. कर्ली टेलला दिलेल्या मुलाखतीत, तिने स्वतःची ओळख फुडी म्हणून केली आहे. करिश्माला भारतीय पदार्थ खायला आवडते. तिला बिर्याणी, काळी डाळ, पालक पनीर, असे पदार्थ खायला आवडतात.
4 / 10
करिश्मा आपल्या डाएटमध्ये विविध पदार्थ खाण्यास पसंती दर्शवते. ती स्वतःचं मन कधी मारत नाही. ती दर दोन तासांनी काही न काही खात असते.
5 / 10
तिला जंक फूड देखील खायला आवडते. ती जंक फूडमध्ये पिझ्झा खाते. ती बाहेरचे फूड घरी ऑर्डर करून खाते. ती सर्वांना मन मारून राहू नका, आवडते पदार्थ खाण्याचा सल्ला देत असते.
6 / 10
व्हॉट आय इट इन अ डे च्या एका मुलाखतीत करिश्माने सांगितले की, ती डिनरला बिर्याणीही खाते, पण पोर्शन कंट्रोल करून खाते. ती अतिप्रमाणात खात नाही. यावरून करिश्माचे मेटाबॉलिज्‍म किती फास्ट आहे हे दिसून येते.
7 / 10
तिला फ्रुट्स देखील खायला आवडते. ती नेहमी तिच्या आवडीचे फळे खाते. ज्यात आंबा, किवी आणि बेरीसारख्या फळांचा समावेश आहे.
8 / 10
करिश्माला लहानपणी दुधीभोपळ्याची भाजी खायला आवडत न्हवती, पण आता ही भाजी ती आवडीने खाते. या भाजीमध्ये विविध पौष्टीक घटक व पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ती आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करायला विसरत नाही.
9 / 10
वजन कमी करताना लोकं डाएटमधून चपाती - भात वगळतात. पण लोलो नाचणी, बाजरी आणि ज्वारीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या भाकऱ्या - चपात्या खाते.
10 / 10
आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण रात्रीचे जेवण झोपण्याच्या तीन तास आधी केले पाहिजे. करिश्मा रात्री 7.30 ते 8:00च्या दरम्यान डिनर करून घेते. ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स