Join us

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसारखी सडपातळ कंबर हवी तर रोज सकाळी करा 'असा' व्यायाम, पाहा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 08:05 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी अॅनिमनल चित्रपटानंतर अनेकांची क्रश म्हणून ओळखली जावू लागली. तिने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Trupti Dimri fitness routine)
2 / 8
अनेकांना तिच्यासारखे सुंदर आणि ग्लॅमरस दिसावे असे वाटतं असते. यासाठी तिच्या डाएट आणि फिटनेसचा प्लान फॉलो करु शकतो. (Trupti Dimri diet plan)
3 / 8
तृप्ती डिमरीसारखी फिगर आपल्याला हवी असेल तर नेमकी ती काय खाते आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करते हे पाहूया.
4 / 8
तिच्या वर्क आउटबद्दल सांगायचे झाले तर ती जीममध्ये हार्डकोर वर्कआउट करते. तसेच दोन तास कार्डिओ, वेटलिफ्टिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, पिलेट्स आणि स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करते.
5 / 8
ती ट्रेडमिलवर १० ते १५ मिनिटे धावते किंवा जॉगिंग करते. ज्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा मिळतो. तसेच शरीरात ऊर्जा निर्माण होते.
6 / 8
जिममध्ये घाम गाळण्यासोबत ती मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करते. सकाळच्या दिनचर्येत योगा करते. ज्यामुळे तिला मानसिक शांती मिळते.
7 / 8
आहारामध्ये ती फळे, हिरव्या भाज्या, उकडलेल्या भाज्या, कमी कॅलरीज असलेले अन्न, उच्च फायबरयुक्त अन्न आणि प्रथिनांसाठी दह्याचा समावेश करते.
8 / 8
ती उत्तराखंडमध्ये राहात असून तिला डोंगराळ भागातील जेवण अधिक आवडते. शुद्ध तुपात बनवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खायला आवडतात.