व्यायामाला वेळच नाही पण वजन आणि पोट कमी करायचंय? 9 मजेशीर उपाय, वजन कमी वाढेल फ्लेक्झिबिलिटी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 1:04 PM 1 / 11१. व्यायाम तर करायचा असतो, पण रोजच्या हेक्टिक रुटीनमधून व्यायामासाठी (hectic schedule) वेळ काढणं खरोखरंच अशक्य होऊन जातं... मग अशावेळी फ्लेक्झिबल राहण्यासाठी, बाॅडी मुव्हमेंट्स करण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडतो... 2 / 11२. फिट राहण्यासाठी व्यायामासारखा दुसरा उत्तम उपाय नाही. पण आता नसेलच एखाद्याला वेळ तर काय करणार.. म्हणूनच तर तुमचं नेहमीचं काम करता करता किंवा तुमच्या आवडीचं असं काही करता करता वेटलॉस, इंचेसलॉस हाेण्यासाठी काय करता येईल, यासाठी बघा या काही टिप्स. आहारतज्ज्ञ सारिका शहा यांनी या टिप्स इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 3 / 11३. व्यायाम न करता बॉडी मुव्हमेंट्स वाढवायच्या असतील, तर लिफ्टचा वापर बंद करा.. पायऱ्या चढा आणि उतरा.. 4 / 11४. ऑफिस, मॉल अशा ठिकाणी गेल्यावर शक्यतो थोडी दुर गाडी पार्क करा.. जवळच जायचं असेल तर गाडी नेऊच नका.5 / 11५. टिव्ही पाहायला बसला असाल तर बसल्या बसल्या हाताच्या बोटांची उघडझाप करणे, हात वर- खाली करणे, हाताच्या मुठी वळून त्या गोलाकार फिरवणे, मान गोलाकार फिरवणे, तळपाय क्लॉकवाईज- ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने फिरवणे असे व्यायाम करा. 6 / 11६. घरूनच काम करत असाल तर काही वेळ बसून काम करण्याऐवजी उभ्या- उभ्या करा..7 / 11७. फोनवर बोलताना वॉकिंग करायला विसरू नका. एक फोन कमीतकमी ५ मिनिटे तरी चालतो. प्रत्येक फोन अटेंड करताना घरातल्या घरात, ऑफिसमध्ये वॉकिंग करा.8 / 11८. कपड्यांच्या घड्या घालताना, स्वयंपाक करताना मस्त म्युझिक लावा आणि डान्स करत करत, एन्जॉय करत करत कामं करा..9 / 11९. याव्यतिरिक्त तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर अगदीच उत्तम. झाडांना पाणी घालणे, झाडांची कटींग किंवा इतर गार्डनिंग ॲक्टिव्हिटी करतानाही भरपूर व्यायाम होतो. 10 / 11१०. एखादी वस्तू खाली पडली की ती पायाने उचलण्याची सवय अनेकांना असते. असं चुकूनही करू नका. खाली वाकायचा कंटाळा मुळीच नको. कारण पोटाचा, कंबरेचा व्यायाम होण्यासाठी खाली वाकलं पाहिजे.11 / 11११. काही जणांचं स्वयंपाक घरातलं सगळं सामान ओट्यावर किंवा आपल्या उंचीनुसार ॲडजस्ट केलेलं असतं. शक्य झालं तर काही सामान खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवा. जेणेकरून काही भांडे, सामान घेताना खाली वाकलं जाईल आणि आपोआपच व्यायाम होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications