Join us   

Protein Rich Veg Food : प्रोटिन्सचा खजिना आहेत रोजच्या खाण्यातल्या ५ भाज्या; रोज खा, कायम हेल्दी, फिट राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 11:12 AM

1 / 5
शरीरातील प्रथिनांची गरज भागवण्यासाठी अनेकदा मांसाहार करण्याची शिफारस केली जाते, विशेषत: अंडी आणि मांस यांचा यात समावेश केला जातो, परंतु भारतात मोठी लोकसंख्या मांसाहार करत नाही. (Protein Rich Veg Food) मग त्यासाठी पर्याय काय आहेत? GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे काम करणार्‍या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी हिंदी वेबसाईटला सांगितले की काही भाज्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. (Vegan option for protein rich vegetables cauliflower broccoli spinach mushroom egg meat alternative)
2 / 5
फुलकोबीत प्रथिने, कॅलरीज, मॅग्नेशियम, आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. हिवाळ्यात या भाजीचे उत्पादन केले जात असले तरी ती वर्षभर बाजारात उपलब्ध असते. नियमित ही भाजी खाल्ल्यास शरीरात प्रथिनांची कमतरता जाणवणार नाही.
3 / 5
ब्रोकोली दिसायला कोबीसारखी असते, ती नेहमीच आरोग्यासाठी उत्तम अन्न मानली जाते, ती खाल्ल्याने केवळ प्रथिनेच नाही तर लोहही मुबलक प्रमाणात मिळू शकते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात याचा समावेश करा जेणेकरून तुमचे स्नायू मजबूत होतील.
4 / 5
जेव्हा जेव्हा सर्वात आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्यांचा उल्लेख होतो तेव्हा पालकाचे नाव सर्वात वर घेतले जाते, त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि फायबर देखील आढळतात, यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात.
5 / 5
खूप कमी लोकांना हे माहित असेल की प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढू शकते, यासाठी तुम्ही रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकता, त्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल आणि तुम्ही आजारीही पडाल.
टॅग्स : हृदयरोगआरोग्य