Join us   

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो? ५ व्यायाम करा, दुखणं कमी होऊन मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 8:07 AM

1 / 8
१. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतेच आहे. या आजारात पायावरच्या नस सुजतात आणि त्या जागेतून रक्तपुरवठा व्यवस्थित न होऊ शकल्याने काळ्या- निळ्या होतात. आणि पाय दुखू लागतात.
2 / 8
२. खूप जास्त वेळ उभे राहणे, कित्येक तास सलग बसून बैठं काम करणे, चालणं कमी असणे, यामुळे तर हा त्रास होतोच. पण अनेक महिलांना बाळंतपणानंतरही हा त्रास सुरू होतो.
3 / 8
३. हा त्रास एकदा वाढला की मग तो खूपच तिव्र स्वरुपाचा होतो. म्हणूनच हा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा त्यातील वेदना कमी करण्यासाठी नियमितपणे काही व्यायाम करणे गरजेचे आहे. नियमित चालणे हा त्यावरचा एक उपाय आहे.
4 / 8
४. पण त्यासोबतच इतर कोणते व्यायाम करावेत याविषयीची माहिती इन्स्टाग्रामच्या karthikmayur या पेजवर देण्यात आली आहे.
5 / 8
५. सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे ताठ उभे रहा. त्यानंतर टाच उचला आणि पायांच्या बोटांवर शरीराचा सगळा भार पेला. ५ ते १० वेळा हा व्यायाम करावा.
6 / 8
६. दुसरा व्यायाम म्हणजे जमिनीवर पाठीवर झोपा आणि पायाची सायकलिंग करा. क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज या दिशेने प्रत्येकी १०- १० वेळा पाय फिरवा.
7 / 8
७. तिसऱ्या व्यायामात पाठीवर झोपा. तसेच एक पाय वर उचला आणि बेल्टच्या साहाय्याने तो ४५ डिग्री अंशात पकडून ठेवा. दोन्ही पायांनी असाच व्यायाम करा.
8 / 8
८. चौथ्या व्यायाम प्रकारात जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून भिंतीला लावा आणि पायाचे तळवे क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने गोलाकार फिरवा.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायाम