Tea Day 2021 : वजन झरझर कमी करण्यासाठी गुणकारी ठरतो 'या' ५ प्रकारचा चहा; प्याल तर नेहेमी मेंटेन राहाल By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:46 AM 1 / 6भारतीयांसाठी चहा म्हणजे जीव की प्राण. सकाळी उठल्यानंतर चहा घेतला नाही असे खूप कमी लोक तुम्हाला दिसून येतात. पण चहाच्या अतिसेवनामुळे तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अनेकजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असल्यानं चहा सोडतात तर काहीजण चहा सोडण्याचा विचार करतात. पण वजन घटवण्यासाठी चहा कशाला सोडायला हवा? रोजच्या चहामध्ये काही बदल करून तुम्ही अशा चहाचे सेवन करू शकता. वैज्ञानिक शोधांनुसार चहाचे काही खास प्रकार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात यामुळे तुम्ही आजारांना स्वत:पासून लांब ठेवू शकता. (5 Types of tea for weight loss)2 / 6: स्टार अनिस चहा पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. या चहाचा वापर पचनासंबंधी आजार बरे करण्यासाठी केला जातो. या चहात गोडवा आणण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. 3 / 6२) पेपरमेंट टी : जर तुम्हाला चहा खूप आवडत असेल तर तुम्ही ग्रीन टीऐवजी असा चहा घेऊ शकता. पचनक्रिया सुधारण्यासाठी असा चहा फायदेशीर ठरतो. असा चहा तयार करण्यासाठी पेपरमिंटच्या पानांचा वापर केला जातो. पेपरमेंट चहा बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात या चहाची पानं घालावी. नंतर ४ ते ५ मिनिटं पुन्हा उकळून गाळणीनं गाळून त्यात मध घालून सेवन करू शकता.4 / 6संशोधनानुसार ग्रीन टी मध्ये आढळणारे रसायन EGCG शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी ही हे फायदेशीर ठरते. एका दिवसात जवळपास ७० कॅलरीज ग्रीन टीमुळे बर्न होऊ शकतात. ग्रीन टी मध्ये एंटी ऑक्सिडेंट्स केटेचिंस असतात. ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढून चरबी कमी होण्यास मदत होते. हा चहा ८५ डिग्री सेल्सियसवर जवळपास २ ते ३ मिनिटांनी तयार होतो.5 / 6 ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून रोज टी तयार केली जाते. हा चहा शरीरासाठी एखाद्या थेरेपीप्रमाणे आहे. केवळ शरीरातील विषारी घटक निघण्यापूरताच नाहीतर त्वचेवर ग्लो येण्यासाठीही असा चहा फायदेशीर ठरतो. 6 / 6 संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार हा चहा ग्री टी पेक्षा जास्त प्रभावी असतो. यामुळे अनावश्यक चरबी जाळण्यास मदत होते. कॉलेस्ट्रॉल शरीरातील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. आणखी वाचा Subscribe to Notifications