दीपिका पदूकोणच्या बिकिनी बॉडीचे सिक्रेट; एवढा प्रचंड व्यायाम आणि डाएट सोपे काम नाही.. Published:January 14, 2023 04:20 PM 2023-01-14T16:20:00+5:30 2023-01-14T16:51:03+5:30
Tips To Get Deepika Padukones Bikini Body In Besharam Rang In Pathaan : सर्वत्र चर्चेत असलेला हा बिकिनी लूक मिळविण्यासाठी तिने काय काय मेहेनत घेतली ते समजून घेऊयात. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पठाण सिनेमा आणि वाद याचीच चर्चा होत आहे. 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोण हीने बिकिनी लूक केला आहे. तिने परिधान केलेल्या नियॉन आणि ऑरेंज रंगाच्या बिकिनीची तुफान चर्चा आहे.पठाण सिनेमातील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यानंतर ते खूप व्हायरल झालं. गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यात दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान कमालीचे फिट अँड फाईन हॉट दिसले आहेत. या गाण्यात दीपिका कमालीची सुंदर दिसली आहे तर ५७ वर्षांचा शाहरुख अतिशय देखणा दिसला आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर दोघांच्या फिटनेसचे विशेष कौतुक झाले. गाण्यातील दीपिकाच्या लुकची देखील खूप चर्चा होत आहे. यातील तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. दीपिकाला हा बिकिनी लूक घेण्यासाठी तिला कठोर मेहेनत करावी लागली होती. सर्वत्र चर्चेत असलेला हा बिकिनी लूक मिळविण्यासाठी तिने काय काय मेहेनत घेतली ते समजून घेऊयात(Tips To Get Deepika Padukones Bikini Body In Besharam Rang In Pathaan).
१. पिलाटे (Pilates) -
दीपिकाला पिलाटे व्यायाम प्रकार करायला फारच आवडते. दीपिका रोज न चुकता पिलाटे आवर्जून करते. पिलाटे व्यायाम प्रकार आपल्या बॉडी पॉश्चर एलाइनमेंट, कोर स्ट्रेंथ आणि मसल्स बॅलन्स करण्यास फार उपयुक्त ठरते. दीपिका पिलाटे करताना त्यातील प्रत्येक व्यायाम प्रकार अतिशय काटेकोरपणे करते.
२. दीपिकाचे डाएट -
दीपिका तिच्या डाएट आणि वर्कआऊटची खूप काळजी घेते. यामुळे तिची त्वचा आणि शरीर तंदुरुस्त राहते. दीपिका तिच्या खाण्या - पिण्याच्या वेळा चुकवत नाही. जेवण असो किंवा छोटे स्नॅक्स मिल ते स्किप होणार नाहीत याची दीपिका आवर्जून काळजी घेते.
३. बॅलेन्स डाएटचे सेवन -
दीपिका बॅलेन्स डाएट करण्यास प्राधान्य देते. आपल्या रोजच्या जेवणात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स यांचा समावेश होईल अशा प्रकारचे डाएट रुटीन ती फॉलो करते.
४. वर्कआउट करण्यासाठी स्वतःला तयार करते -
वर्कआउट करण्याआधी वॉर्मअप करणे गरजेचे असते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. दीपिका आपला हेव्ही वर्कआउट सुरु करण्याआधी रनिंग आणि काही वॉर्मअप अॅक्टिव्हिटी नक्की करतेच. वॉर्मअप करून झाल्या नंतरच ती हेव्ही वर्कआउट करण्यास सुरुवात करते.
५. स्ट्रेचिंग एक्सरसाइज -
हेव्ही वर्कआउट सुरु करण्यापूर्वी वॉर्मअप जितके महत्वाचे असते तितकेच वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणे आवश्यक असते. स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणे दीपिकाला खूप आवडते. स्ट्रेचिंग एक्सरसाइज करताना ती त्याचा आनंद व मजा घेत हे एक्सरसाइज करते.
६. किकबॉक्सिंग -
दीपिकाला वेगवेगळ्या व्यायाम पद्धती फॉलो करायला आवडतात. सध्या ती योगा, पिलाटे (Pilates), हिट वर्कआउट्सचे प्रशिक्षण घेत आहे. यासोबतच तिला किकबॉक्सिंग करायला देखील आवडते.
७. सातत्य असणे गरजेचे -
कोणतीही गोष्ट करताना त्यात सातत्य असणे खूपच महत्वाचे असते. आपल्या व्यायामाच्या रुटीनमध्ये रोज सातत्य राहील याची खबरदारी दीपिका घेते. जेव्हा कधी ती प्रवासात असेल किंवा एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसेल अशावेळी किमान १० मिनिटे स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा ट्रेडमिलवर वॉक करणे पसंत करते.
८. स्ट्रेंथ ट्रेनिंग -
एका शास्त्रीय अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतल्याने तुमचे मेटॅबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया करण्याचा वेग वाढतो. यामुळे आपण एकावेळी अधिक कॅलरीज बर्न करू शकतो. याच सूत्राचा वापर करून दीपिका विविध प्रकारच्या एक्सरसाइज करून आपल्या मेटॅबॉलिझमची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्याच्या प्रयत्नात असते.
९. जुजुत्सू -
जुजुत्सू ही चीन आणि जपानमध्ये विकसित झालेली एक कला आहे. चीन आणि जपानमध्ये विकसित झालेल्या शस्त्राशिवाय आत्मरक्षणाची एक पद्धत म्हणजे जुजुत्सू. स्वतःच्या शारीरिक वजनाचा आणि सामर्थ्याचा वापर करून हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर आपण हल्ला करून स्वसंरक्षण कसे करावे यांचेदेखील प्रशिक्षण दीपिका घेत आहे.
१०. उपाशी पोटी राहू नका -
दीपिका दर दोन तासांनी काहीतरी हेल्दी खातेच. ती स्वतः कधीच उपाशी पोट ठेवत नाही. नारळाचे पाणी, फळ, फळांचे ज्यूस, स्मूदी यांसारख्या पदार्थांचे सेवन करून ती स्वतःला फिट अँड फाईन ठेवते.