Join us   

Tips for Weight Lose Faster : पोट, मांड्याचा आकार कमीच होत नाहीये? ४ उपाय, कायम स्लिम अ‍ॅण्ड फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 12:30 PM

1 / 7
हिवाळ्यात भूक लागते (Winter Health Tips) अशावेळी स्वत:ला फिट ठेवणं कोणत्याही चॅलेंजपेक्षा कमी नसतं. हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते आणि खूप आळस येतो. (Tips for Weight Lose Faster) हेल्थ एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात आहारात बदल केल्यास वजन वेगानं कमी होऊ शकतं. जर तुम्ही वजन वाढण्याच्या भितीनं गोड खाणं सोडलं असेल तर वजन नियंत्रणात ठेवण्याचे काही सोपे उपाय पाहूया. (How to lose bosy fat faster)
2 / 7
१) आरोग्य तज्ज्ञ लोकांना हिवाळ्याच्या काळात निरोगी आणि पोटभर नाश्ता खाण्याचा सल्ला देतात. सकाळी उठण्याचा प्रयत्न करा आणि 3 तासांच्या आत नाश्ता करा. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल आणि तुमचे शरीर दिवसभर सक्रिय राहील.
3 / 7
२) जर तुम्ही मिठाईचे शौकीन असाल आणि मिठाई पुन्हा पुन्हा खात असाल तर थोडी कमी गोड मिठाई खा. यासोबत तुम्ही जी काही मिठाई खात आहात त्यात नैसर्गिक स्वीटनरचा वापर करा. साखरेचा वापर टाळून गूळ आणि खजूर जास्त वापरा.
4 / 7
३) रात्री झोपताना हलकं आणि आरोग्यदायी जेवण घ्या. लक्षात ठेवा रात्रीचे जेवण झोपण्याच्या २ ते ३ तास ​​आधी घेतले पाहिजे. यामुळे अन्न सहज पचते आणि वजनही टिकून राहते.
5 / 7
४) वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी. गरम पाण्याने चरबी जलद जळते आणि वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
6 / 7
५) आल्याचा चहा हिवाळ्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आल्याचा चरहा आळस दूर करतो आणि शारीरिक हालचालींसाठी शरीराला तयार करतो.
7 / 7
आल्याचा चहा हिवाळ्यात वाढणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासूनही आराम देतो.
टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य