Join us   

धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे पती सांगतात हृदयाच्या मजबुतीसाठी ५ व्यायाम- हृदयरोगाचा धोका टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2024 3:09 PM

1 / 8
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती म्हणजेच डॉ. श्रीराम नेने यांचे सोशल मिडियावरचे फॅन फॉलोईंग सध्या जबरदस्त वाढते आहे. कारण ते ज्या काही साध्यासोप्या हेल्थ टिप्स सांगतात त्या अनेकांना अतिशय आवडत असून त्या खूपच परिणामकारक आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. (top 5 exercises for strong heart)
2 / 8
आताही डॉ. श्रीराम नेने यांनी हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. हल्ली हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढते आहे. अगदी विशी- पंचविशीतल्या तरुण लोकांनाही हार्टअटॅक आल्याचे नेहमीच ऐकायला येते. त्यामुळे अगदी कमी वयापासूनच हृदयाच्या मजबुतीसाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. (Dr. Shriram Nene suggests how to keep your heart strong)
3 / 8
डॉ. नेने यांनी असे काही व्यायाम सांगितले आहेत जे हृदयाला मजबूत करून हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी निश्चितच मदत करतील. ते व्यायाम नेमके कोणते ते पाहा...
4 / 8
त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम आहे जॉगिंग. आठवड्यातून काही दिवस जॉगिंग नियमितपणे करा.
5 / 8
ज्यांना डान्स करायला आवडते, त्यांनी एखादं फास्ट म्युझिक लावून बिंधास्तपणे नाचावं. कारण नृत्य केल्यानेही हृदयाना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा, रक्तपुरवठा होतो आणि त्याचं कार्य अधिक उत्तम होण्यास मदत होते. तुम्ही त्यासाठी झुंबा हा व्यायाम प्रकारही निवडू शकता.
6 / 8
हृदय मजबूत करण्यासाठी स्विमिंग करणेही अतिशय उपयुक्त ठरते.
7 / 8
तुम्हाला सायकलिंग आवडत असेल तर हृदय स्ट्राँग ठेवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून ४ ते ५ दिवस नियमितपणे सायकलिंग करा.
8 / 8
दोरीवरच्या उड्या मारणे हा देखील हृदयासाठीचा एक उत्तम व्यायाम आहे, असं डॉ. श्रीराम नेने सांगतात.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायाममाधुरी दिक्षितहृदयविकाराचा झटकाहृदयरोग