Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

Published:December 2, 2022 04:39 PM2022-12-02T16:39:09+5:302022-12-02T17:01:11+5:30

Top 6 food for good health : बदाम, काजू आणि अक्रोड यांसारख्या नट्समध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते.

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अशक्तपणा, थकवा येण्याचा त्रास अनेकांना जाणवतो. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, सुस्त जीवनशैली यामळे हा त्रास वाढत जातो. (Health tips) फास्ट फूडच्या सेवनानं अनेकांचं शरीर पोकळ होतं. कारण यात कोणतीही पोषक तत्व नसतात. (Top 6 food for good health)

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

भेसळयुक्त खाद्यपदार्थामुळे शरीराला पोषण मिळत नाही. तरूण पणातच रक्ताची कमतरता, हाडं कमकुवत होणं असे त्रास वाढतात. न्युट्रिशनिस्ट एंड डाएटिशियन शिखा अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार थकवा आणि अशक्तपणापासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नाही. काही मोजक्या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकता. (Best Food for Health)

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे शरीराला ताकद देते तसेच स्नायू दुखणे, सूज आणि क्रॅम्प्सपासून बचाव करते. पोटॅशियम शरीरातील ग्लायकोजेनद्वारे स्नायूंच्या प्रथिनांना प्रोत्साहन देते. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामानंतर केळी दुधासोबत घ्यावी.

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

दूधात वे प्रोटीन आणि कॅसिइन प्रोटीन असते. व्हे प्रोटीन पचनक्रियेसाठी उत्तम ठरते. दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांमध्ये प्रोटिन्स व्यतिरिक्त कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना बळकटी येण्यास मदत होते. रोज दूध, दही, ताक, पनीचं सेवन केल्यानं तब्येत चांगली राहते.

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

जर तुम्ही व्यायाम करत असाल तर रताळे तुमच्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे. त्यात कमी कॅलरीज आणि जास्त कार्बोहायड्रेट असतात, जे तुमच्या वर्कआउट दरम्यान तुमची ऊर्जा टिकवून ठेवतात. हा फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. रताळे हे उत्तम प्री वर्कआऊट सुद्धा आहे. जे, भूक नियंत्रित करण्यास, पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यास मदत करते.

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

शतावरी ही भाजी म्हणून खाल्ली जाते आणि एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषधी वनस्पती देखील आहे. त्यात फोलेट, फायबर, क्रोमियम आणि जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि के आढळतात. हे अँटिऑक्सिडंट्सचे भांडार आहे, ज्यामध्ये पेशींचे नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सला दूर करण्याची क्षमता असते. जर तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही याचे सेवन अवश्य करा.

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

ओट्समध्ये निरोगी कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आढळतात, जे मेटाबॉलिज्म रेट वाढवतात. त्यात व्हिटॅमिन ई, फॉलिक अॅसिड, थायामिन, बायोटिन, जस्त आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. यामुळेच याचे सेवन केल्याने तुमचे पोट चांगले राहते. शरीरात काहीही खाण्यासाठी किंवा प्यायचे असेल तर पचनसंस्था बरोबर असणे आवश्यक असते हे लक्षात ठेवा.

Top 6 food for good health : थंडीत थकवा, अशक्तपणा जाणवतोय? ६ पदार्थ खा, शरीरात रक्तही वाढेल, फिट राहाल

बदाम, काजू आणि अक्रोड यांसारख्या नट्समध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते. जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी भिजवून या पदार्थांचे सेवन करा.