Top 7 tips to reduce belly fat : 7 tips to reduce belly fat how to lower body fat:
पोटावरची चरबी भराभर घटवण्यासाठी ७ टिप्स; पोट, कंबर दिसेल सुडौल-आत्मविश्वासही वाढेलPublished:July 25, 2023 08:48 AM2023-07-25T08:48:00+5:302023-07-25T08:50:02+5:30Join usJoin usNext Top 7 tips to reduce belly fat : दिवसभरात अनेकदा आपण-चहा कॉफीचे सेवन करत असतो. जास्त साखरयुक्त पदार्थ शरीरात गेल्यानं एक्स्ट्रा कॅलरीज वाढतात. याशिवाय सतत बसून बसून फॅट्स वाढल्यानं कालांतरानं शरीर बेढब दिसू लागतं. (How to loss belly Fat) पोट जितके सहज बाहेर जाते तितके आत जात नाही. बेली फॅट कमी करण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरू शकतात. हे अगदी सोपे उपाय आहेत जे कोणीही करू शकते. १) सकाळी उठून कोमट पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म वाढतो. तुम्ही जिऱ्याचे पाणी पाणीही पिऊ शकता. २) वजन कमी करण्यासाठी अल्कोहोलसारख्या मादक पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. मादक पदार्थांसोबत कोल्ड्रिंक्स आणि सोडा यांचे सेवन कमी करा ३) फायबरयुक्त पदार्थ खाणे देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तुम्ही तुमच्या आहारात लापशी, पोहे, फळे आणि फायबरचे इतर स्रोत समाविष्ट करू शकता. ४) वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर पूर्ण झोप घ्या. अर्धी अपूर्ण झोप लठ्ठपणा वाढवते. ५) पोटाची चरबी कमी करण्यासाठी चालणे देखील शक्य आहे. दुपारी आणि रात्री जेवणानंतर 20 मिनिटे चाला. यावेळी चालणे खूप प्रभावी आहे. ६) जेवल्यानंतर २० मिनिटांनी गरम पाणी प्यायल्यानेही चरबी कमी होण्यास मदत होते. ७) पोट कमी करण्यासाठी आहारात मीठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा. यामळे फॅट कमी होऊन मसल्स वाढतील.टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सHealth TipsWeight Loss Tips