गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 1:05 PM 1 / 7आजकाल शरीताल व्हिटामीन आणि मिनरल्सची कमतरता सर्वाधिक पाहायाला मिळते. मार्केटमध्ये मिळणाऱ्या दूधातून शरीराला पोषक तत्व योग्य प्रमाणत मिळत नाहीत. अशा स्थितीत शरीराला कॅल्शियमची कमतरता उद्भवते. 2 / 7कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात आणि हाडं कमकुवत होतात. कॅल्शियम जास्त प्रमाणात कमी झाल्यास स्ट्रेस आणिडिप्रेशनही येऊ शकते. कॅल्शियमचची कमतरता पूर्ण करण्यासाठी रोजच्या आहारात २ प्रकारच्या बियांचा समावेश केला तर हाडांची झिज भरून निघेल.3 / 7शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी खसखस वापरा. खसखस हे लोह आणि कॅल्शियम सारख्या खनिजांचे भांडार आहे. 4 / 7तांबे आणि जस्तही आढळतात. ही सर्व खनिजे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. खसखस उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासही मदत करते. तुम्ही फायबर युक्त खसखस दुधात भिजवून देखील खाऊ शकता.5 / 7आहारात बियांचा समावेश करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिया बियांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. 6 / 7जर तुम्ही रोज 1-2 चमचे चिया बिया खाल्ल्यास शरीराला सुमारे 180 मिलीग्राम कॅल्शियम मिळते. कॅल्शियम व्यतिरिक्त, चिया बियांमध्ये ओमेगा -3 आणि फायबर देखील असतात.7 / 7चिया बियांमध्ये बोरॉन देखील असते जे शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे योग्य शोषण करण्यास मदत करते. तुम्ही चिया बिया पाण्यात भिजवून, स्मूदी, दही किंवा दलियामध्ये मिसळून खाऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications