Join us   

Veg Protein Food : अंगात रक्त कमी, थकवा येतो? ५ व्हेज पदार्थ खा, प्रोटिन भरपूर, रक्तही वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 1:12 PM

1 / 9
आपल्या शरीराला फिट निरोगी ठेवण्यासाठी प्रोटिन्सची आवश्यकता असते. मासंपेशी, टिश्यू, त्वचा आणि केसांमध्ये मिळून १० हजारांपेक्षा जास्त प्रोटिन्स असतात. प्रोटिन्स शरीराला उर्जा देण्यासाठी आणि ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्यासाठी महत्वाचे मानले जातात. (Veg protein sources) यामुळे एंटीबॉडी बनवण्यापासून पेशींना रक्त पुरवण्यास मदत होते. शरीरात प्रोटीन्सचे प्रमाण कमी असले की त्याची लक्षणं जाणवतात आणि अशक्तपणा, थकवा येऊ शकतो. (Protein benefits bones kidney this 7 sign shows low level of protein)
2 / 9
वेबएमडीच्या रिपोर्टनुसार दैनंदीन कॅलरीजमधून १० टक्के प्रोटिन मिळायला हवं. नाश्त्याला ग्रीक योगर्ट, दुपारच्या जेवणात चिकन, अंडी, शेंगदाणे, पनीर आणि रात्रीच्या जेवणात काळ्या बिन्स, सॅलेड खाऊ शकता.
3 / 9
रिपोर्टनुसार लहान बाळांना दिवसभरात सुमारे १० ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते. शाळेतील मुलांना दररोज सुमारे 19-34 ग्रॅम प्रथिने, पौगंडावस्थेतील मुलांना दररोज सुमारे 52 ग्रॅम, किशोरवयीन मुलींना दररोज सुमारे 46 ग्रॅम, प्रौढ पुरुष सुमारे 56 ग्रॅम, प्रौढ महिलांना सुमारे 46 ग्रॅम आणि गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्यांना स्त्री दररोज सुमारे 71 ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते.
4 / 9
सूज येणं, मूड स्विंग्स, केस, नखांच्या समस्या, थकवा येणं, सतत भूक लागणं, जखमा होणं, सतत आजारी पडणं
5 / 9
भूक कंट्रोल होते, मासपेशींची स्ट्रेंथ वाढते, हाडं मजबूत होतात, अनावश्यक फूड क्रेव्हिंग्स कमी होतात, मेटाबॉलिझ्म वाढतो. किडनीचे आरोग्य हेल्दी राहते.
6 / 9
शेंगदाण्यांमध्ये जास्त प्रथिने असतात. शेंगदाण्यामध्ये सर्व 20 अमीनो ऍसिडचे प्रमाण असते आणि ते 'आर्जिनिन' नावाच्या प्रथिनाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.
7 / 9
भारतीय जेवण डाळींशिवाय अपूर्ण आहे. डाळीत भरपूर प्रोटिन्स असतात. यात आवश्यक अमीनो एसिड्स असतात. यात कि फेनिलएलनिन, ल्यूसीन, आइसोल्यूसीन, वेलिन, लाइसिन, आर्जिनिन असते.
8 / 9
चणे प्रोटिन्सनी परिपूर्ण असतात. शाकाहारी जेवणात चणे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. चण्यांमध्ये जवळपास १८ टक्के प्रोटिन्स असतात. जे इतर कोणत्याही डाळींच्या तुलनेत जास्त आहे. याव्यतिरिक्त यात लायसिन, अर्जिनिन असते.
9 / 9
दिवसभरातली प्रोटिन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी पनीर हा उत्तम ऑपश्न आहे. शाकाहारींसाठी पनीर हा उत्तम ऑपश्न आहे.
टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य