Vitamin B12 Foods : Foods You Should Eat if You Have a B12 Deficiency
थकवा-अशक्तपणा जाणवतो, B-१२ कमी? भरपूर व्हिटामीन B-१२ असणारे ५ पदार्थ खा रोजPublished:July 14, 2023 12:55 PM2023-07-14T12:55:15+5:302023-07-14T15:53:15+5:30Join usJoin usNext Vitamin B12 Foods : बी १२ कमी आहे असं अनकेजण सांगतात, त्यासाठी आपल्या आहारात बदल करायला हवा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन्स, कॅल्शियमची आवश्यकता असते. व्हिटामीन्स, आयर्न यांसारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. (Health Tips) यासाठी व्हिटामीन बी-१२ गरजेचं असतं. व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी फायदेशीर ठरतं. हे एक सोल्यूबल व्हिटामीन आहे. हे व्हिटामीन शरीरातील लाल रक्त पेशी म्हणजेच रेड ब्लड सेल्स तयार करून सेंट्रेल नर्वस सिस्टिम, नसांना मजबूत करण्याचे काम करते. (Foods for vitamin B-12) व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे शरीराच्या विकासात अडथळे येतात. गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. भूक न लागणं, गॅस होणं, हात-पाय सुन्न पडणं, हाडं-मांसपेशी कमकुवत पडणं, थकवा वाटणं असे त्रास होतात.न्युट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांच्यामते फक्त मांसाहारातच नाही तर काही व्हेज पदार्थांमध्येही भरपूर व्हिटामीन्स असतात. म्हणून यांचा आहारात समावेश करायला हवा. (Foods You Should Eat if You Have a B12 Deficiency)पालक पालक आयर्नचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे. यात व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही पालकाच्या भाजीचा आहारात समावेश करू शकता किंवा स्मूदी किंवा सॅलेडसुद्धा चांगले पर्याय आहेत.बीट बीट आयर्न, फायबर्स, पोटॅशियम, व्हिटामीन बी १२ चा चांगला स्त्रोत आहे. बीटात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन्, मिनरल्स, आणि कॅल्शियम असते. तुम्ही सॅलेड्टच्या स्वरूपात बीटाचे सेवन करू शकता. भोपळा भोपळा खूप कमी लोक खातात. भोपळा फळं भाजीच्या स्वरूपात ओळखला जातो. यात मिनरल्स, फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे.मशरूम मशरूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन बी १२ असते. मशरूममध्ये व्हिटामीन डी, प्रोटीन, कॅल्शियम यांसारखे मिनरल्स जसं की जर्मेनियम, कॉपर, नियासिन, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते.बटाटा बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरातील एल्कलाईनचे प्रमाण संतुलित राहते. बटाट्यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन ए आणि डी सारख्या शरीरासाठी पुरेसे पोषक असतात. हे मॅग्नेशियम, लोहाचा देखील चांगला स्रोत आहे.टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सHealth TipsFitness Tips