रोज पायी चालता तरी पोट १ इंचही कमी होईना? ५ कॉमन चुका टाळा, कमी वेळात येईल स्लिम लूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 4:59 PM 1 / 8फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉक (Morning Walk) खूप महत्वाचे असते. वॉक केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते. याशिवाय सकाळी वॉक केल्याने ताण-तणाव दूर राहतो. मॉर्निंग वॉक करताना काही बेसिक मिस्टेक्स केल्यामुळे वॉकचा पुरेपूर फायदा मिळत नाही आणि चालण्याचा काहीच उपयोग होत नाही. (Avoid 5 Mistakes While Morning Walk)2 / 8मॉर्निंग वॉकला जाताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा. वॉक करून आल्यानंतर तेलकट पदार्थ खाऊ नका. जर तुमचे पाय दुखत असतील तर वॉक करणं टाळा. 3 / 8१) सकाळी चालल्याने आळस आणि थकवा दूर होतो. याशिवाय शरीर फिट आणि एक्टिव्ह राहते. 4 / 8२) मॉर्निंग वॉकनंतर जास्त खाऊ नका. कारण तुम्ही जास्त तेलकट किंवा कॅलरीजयुक्त पदार्थ खाल्लेत तर तुम्ही फिट एनर्जेटिक राहू शकणार नाही. 5 / 8३) वॉक केल्यानंतर भरपूर पाणी प्या. जेणेकरून तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणि शरीर हायड्रेट राहील.6 / 8४) वॉकनंतर स्ट्रेचिंग करायला विसरू नका. स्ट्रेचिंगमुळे मांसपेशींचे आरोग्य चांगले राहील आणि वजनही कंट्रोलमध्ये राहील.7 / 8५) मॉर्निंग वॉकनंतर काय करायचं याचा प्लॅन रेडी ठेवा अन्यथा दिवसभर आळस येऊ शकतो. 8 / 8नेहमी हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. फळं, ज्यूस असे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणखी वाचा Subscribe to Notifications