वजन कमी करायचंय पण डायटींग, व्यायाम आवडत नाही? ५ टिप्स, वजन झटपट होईल कमी By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 4:26 PM 1 / 7लोक वजन कमी करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. डायटिंगच्या नावावर तासनतास उपाशी राहतात. तरीही हवातसा बदल शरीरात दिसत नाही. फिटनेस आणि फॅटलॉस लोकांसाठी मोठं चॅलेंज बनलंय. डायटिंगशिवाय वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (Weight Loss Tips)2 / 7वेट लॉससाठी डायटिंगची गरज नाही. कमी कॅलरीज घेऊन तुम्ही वजन वाढ टाळू शकता. लो कार्ब्स आणि हाय प्रोटीन्सयुक्त आहार घ्या. कार्ब्स पूर्णपणे बंद न करता दिवसभरातून एकदा गुड कार्ब्स खा. 3 / 7नियमित स्वरूपत व्यायाम केल्यानं अधिक कॅलरीज बर्न होतात. व्यायामामुळे हार्ट, ब्लड प्रेशर आणि मेंटल हेल्थ चांगली राहते. दर दिवशी ८००० ते १२००० स्टेप्स चालल्यानं कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. याशिवाय ओव्हर ऑल हेल्थवरही परिणाम होतो. 4 / 7वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणंसुद्धा गरजेचं असतं. जेणेकरून मसल्स रिकव्हरी वेगानं होईल. जर तुम्ही रात्री साडे सात तासांपेक्षा जास्त झोपाल तर फॅट बर्निंग प्रोसेस फास्ट होते. यामुळे मेटाबॉलिझ्म चांगलं राहतं. 5 / 7वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रोसेस्ड फूड टाळायला हवं. वेस लॉस करण्यासाठी तुम्ही रेडी टू ईट प्रोसेस्ड फूडचे सेवन टाळू शकता. नॉर्मल फूडच्या तुलनेत पॅक्ड फूडमध्ये फायबर्सचे प्रमाण कमी असते. म्हणून जेवण चावून खा. 6 / 7डॉक्टरांन सांगतात की लोक रोज काही ना काही कारण सांगतात आणि 'कल से डाएट पक्का' किंवा 'मी सोमवारपासून व्यायाम सुरू करेन असं म्हणतात'., पण तुम्ही सुरुवात केली आहे का? याचे उत्तर तुमच्याकडे नसेल. त्यामुळे वजन कमी करायला वेळीच सुरुवात करा.7 / 7जेव्हा तुम्ही त्यासाठी तयार असाल तेव्हा तुमचे मन आणि शरीर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. तुमचे शरीराला तुमच्या आवडत्या फूडची क्रेव्हींग जाणवेल. त्यामुळे स्वत:ला मानसिकरित्या तयार करा. आणखी वाचा Subscribe to Notifications