कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

Published:July 7, 2023 07:06 PM2023-07-07T19:06:38+5:302023-07-08T15:01:01+5:30

What is the cheapest way to get protein : शरीरातील प्रोटीन्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काही शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

बरेच लोक पचायला जड म्हणून मासांहार करणं टाळतात. यामुळे त्यांच्या आहारातून प्रोटीन्स मिळणं कठीण होतं. मसल्स आणि हाडांच्या विकासासाठी, हॉर्मोनल इम्बेलेन्स टाळण्यासाठी या पोषक तत्वांची शरीराला आवश्यकता असते. शरीराच्या गरजेप्रमाणे प्रोटिन न खाल्ल्यास हाडांचा विकास व्यवस्थित होत नाही. (Cheap and Healthy Sources of Protein)

कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

शरीराची प्रोटीन्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काही शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. नॉनव्हेज पदार्थांपेक्षाही जास्त प्रोटीन्स काही शाकाहारी पदार्थांमध्ये असते. ज्यामुळे हाता-पायांची ताकद वाढण्यास मदत होते.

कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

१) सोयाबीन खाल्ल्यानं शरीरातील प्रोटीन्सची कमतरता पूर्ण होते. या खाद्यपदार्थांमधून कार्ब्स, फायबर्स, व्हिटामीन यांसारखे मिनरल्स मिळतात. जे शरीराल पूर्णपणे निरोगी बनवण्यास मदत करतात.

कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

२) टोफू हे पनीरसारखे दिसणारे खाद्य आहे. हे सोयाबीनपासून बनवले जाते. त्‍यामुळे त्‍यामध्‍ये प्रथिने देखील भरलेली असतात. ज्यांना दूध आणि चीजची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

३) डाळीत कार्ब्स, फायबर्ससह प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात मिळतात. उडीदाची डाळ प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहे. हाता पायांची ताकद वाढवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळींचे सेवन फायदेशीर ठरतं.

कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

४) USDAच्या माहितीनुसार नुसार, फक्त 100 ग्रॅम चणे 8.86 ग्रॅम हे पोषक तत्व प्रदान करतात. चण्याची उसळ किंवा खिचडी, भाजीत याचा समावेश करा.

कमी खर्चात भरपूर प्रोटीन! ५ व्हेज पदार्थ रोज खा, ताकद वाढेल-कायम दिसाल फिट

५) हिरव्या मटारमधील लहान दाणे तब्येतीसाठी बरेच फायदेशीर ठरतात. यात तुमच्या संपूर्ण शरीराला पोषण देण्याची क्षमता असते. प्रोटीन्स व्यतिरिक्त यात फायबर, थियामीन, फॉलेट, मँगनीज आणि अनेक व्हिटामीन्स असतात.