वजन वाढणार नाही, हृदय- फुफ्फुस ठणठणीत राहील- फक्त १ काम करा, सायकल आहे का घरात? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2024 11:31 AM 1 / 9वाढत्या वजनाचं, कोलेस्ट्रॉलचं टेन्शन असेल, आपल्याला भविष्यात मधुमेह, रक्तदाब असा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर अगदी आतापासूनच १ काम नियमितपणे करा.. तेवढं एक काम दररोज २५ ते ३० मिनिटांसाठी केलं तर अगदी वय वाढलं तरी तुम्ही मात्र तरुण आणि ठणठणीत राहाल. 2 / 9ते काम म्हणजे सायकलिंग करणे. दररोज नियमितपणे सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. ते नेमके कोणते याविषयी जनजागृती व्हावी म्हणून ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून जगभर साजरा केला जाताे. सायकल चालविल्याने नेमके कोणते फायदे होतात याविषयी तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल जटाळे आणि डॉ. विजय व्यवहारे यांनी दिलेली ही माहिती...3 / 9नियमितपणे सायकलिंग केलयाने हृदयाच्या आजारापासून लांब राहू शकतो. 4 / 9फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि रक्तवाहिन्यांचे आजार होत नाहीत.5 / 9नियमितपणे २५ ते ३० मिनिटे सायकलिंग केलयाने शरीरात हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात.6 / 9दररोज सायकल चालविल्याने मन दिवसभर प्रसन्न राहण्यास मदत होते. त्यामुळे स्ट्रेस लेव्हल खूप कमी होते.7 / 9सायकलिंग केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पक्षाघातसारख्या आजारांचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो.8 / 9पोट, मांड्या यावरील चरबी कमी होते. तसेच नियमितपणे सायकलिंग केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. 9 / 9सांधे तंदुरुस्त राहतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होत नाही. एकंदरीतच सायकलिंग केल्यामुळे शारिरीक क्षमता वाढण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications