1 / 11मुलांना रोज डब्यांत पौष्टिक आणि हेल्दी असे काय द्यावे असा प्रश्न सगळ्याच आयांना पडतो. सतत विकतचे काही ना काही (10 protein rich tiffin ideas for school kids) किंवा बिस्कीटे देणे हा मुलांचे पोषण होण्यासाठी तितका चांगला पर्याय नाही. त्यामुळे त्यांना आवडेल आणि पोषकही होईल असा कोणता खाऊ द्यायचा याचे काही सोपे पर्याय पाहूयात. असे १० पदार्थ ज्यातून मुलांना प्रोटीन आणि इतर महत्वाचे पोषक घटक मिळतील, ते नेमके कोणते ते पाहा.2 / 11मुलांच्या आवडत्या भाज्या किंवा गाजर, काकडी, कांदा, किसलेले पनीर यांचे काप करुन मल्टिग्रेन पिठापासून तयार केलेल्या चपातीमध्ये रोल करुन मुलांना हा पौष्टिक व हेल्दी चीज व्हेजी रोल डब्यांत द्यावा. 3 / 11अंडे हा प्रोटीन रिच पदार्थ असल्याने अंड्याचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. उकडलेले अंडे, ऑम्लेट, अंडा फ्राय अशा अंड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारासोबत आपण एग सँडविच देखील मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो. अंड्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते आणि सारखी भूक लागत नाही.4 / 11जर मुलांना चमचमीत चाट खायला आवडत असेल तर आपण डब्यांत छोले चाट देखील देऊ शकता. छोले उकडवून त्यात कांदा - टोमॅटो बारीक चिरुन घालावेत तसेच चवीनुसार चाट मसाला भुरभुरावा. असे प्रोटीनरीच छोले चाट मुलांसाठी पौष्टिक असा पदार्थ होऊ शकतो. 5 / 11 पनीरचे छोटे तुकडे मसाल्यांमध्ये घोळवून घ्यावेत. मग चपातीमध्ये हे पनीरचे तुकडे, टोमॅटो, कांदा, भोपळी मिरचीचे बारीक काप, चटणी, सॉस घालून चपाती गोलाकार गुंडाळून रोल करून घ्यावी. 6 / 11साल असलेली हिरवी किंवा पिवळी मूग डाळ भिजत ठेवून मग त्याचे पीठ वाटून घ्यावे. या तयार पिठात आपल्या आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, गाजर किंवा इतर भाज्या घालूंन बॅटर तयार करावे. हे तयार बॅटर तव्यावर सोडून त्याचे उत्तप्पा तयार करून घ्यावेत. 7 / 11सोया सॉस, चिली सॉस, भोपळी मिरची, हिरवे वाटाणे, किसलेले गाजर तेलात हलकेच परतून त्यात टोफूचे चौकोनी तुकडे घालावेत. मग आपल्या आवडीनुसार मसाले घालावेत. सगळ्यांत शेवटी पांढरे तीळ वरुन भुरभुरवून घालावेत. चमचमीत व पौष्टिक असे टोफू फ्राय खाण्यासाठी तयार आहे.8 / 11 छोले आणि रताळं उकडवून घेऊन ते एकत्रित मॅश करून घ्यावे. मॅश करुन घेतलेल्या बॅटरचे गोलाकार पॅटिस तयार करून घ्यावेत. आपण या पॅटिसमध्ये किसलेले गाजर, बीट, उकडलेले मटार किंवा इतर भाज्या घालूंन अधिक पौष्टिक करु शकतो. 9 / 11पनीर किसून घेऊन ते कणकेच्या गोळ्यात भरून स्टफ पनीर पराठा तयार करून घ्यावा. हा पनीर पराठा दही किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा. 10 / 11वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रुटसचे छोटे तुकडे करून ते एकत्रित करावेत. त्यानंतर त्यात आवडीनुसार चाट मसाला व चवीसाठी मीठ घालावे. असे हेल्दी आणि पौष्टिक फ्रुट सॅलॅड आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो. 11 / 11 हिरवे मूग, काळे चणे अशी इतर कडधान्य उकडवून एकत्रित एका बाऊलमध्ये घ्यावी. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावेत. अशाप्रकारे कडधान्यांचे पौष्टिक सॅलॅड मुलांना टिफिनमध्ये द्यावे.