1 / 12ओव्याच्या पानांची खुसखुशीत भजी आपण तयार करून आपण खातो. पण तुम्हाला ओव्याच्या पानांचे इतर उपयोग माहिती आहेत का? 2 / 12ओव्याची पाने प्रचंड औषधी असतात. म्हणून घरात ओव्याचं रोप हवंच. नसेल तर लावून घ्या.3 / 12१.ओव्यामध्ये अॅन्टिऑक्सिडंट्स असतात. ज्यांच्यामुळे शरीराला कोणतीही लागण होत नाही. ही पाने तुम्हाला सुदृढ राहण्यासाठी मदत करतील.4 / 12२.ओव्यामध्ये जैवप्रतिकारक गुणधर्म असतात. जे कोणतेही हानिकारक जीवाणू व वायरस पसरण्यापासून थांबवतात. शरीर सशक्त ठेवण्यासाठीचा हा एक नैसर्गिक उपाय आहे.5 / 12३.श्वसनक्रियेला चलन देण्यासाठी ओवा अत्यंत उपयोगी असतो. याचे रोपही भरपूर प्राणवायु उत्पन्न करते. 6 / 12४. छातीतील किंवा पोटातील जळजळ कमी करण्यासाठी ओवा चांगला. त्याच्यामध्ये दाहविरोधी सत्व असतात. 7 / 12५. ओवा पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतो. ब्लोटिंग कमी करतो. तसेच वजन कमी करण्यातही मदत करतो. गॅसेसची समस्या असेल तर कमी करतो. 8 / 12६. ओव्यामधील अॅन्टिऑक्सिडंट्स स्ट्रेसची पातळी कमी करण्यास मदत करतात. डोकं शांत राहते. मनही प्रसन्न राहण्यास मदत होते.9 / 12७. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी योग्य राखण्यासाठी ओवा चांगला असतो. त्यामुळे हृदयाचे विकार होत नाहीत. 10 / 12८. पाळीमध्ये येणारे क्रॅम्प्सही ओव्याने कमी होतात. पोटाला आणि ओटी पोटाला आराम मिळतो. 11 / 12९. ओव्यात भरपूर जीवनसत्वे असतात. तसेच बरीच पोषकतत्वेही असतात. त्यांच्यामुळे केसांचे आरोग्यही चांगले राहते. तसेच त्वचाही चांगली राहते.12 / 12१०. मधुमेहाचा धोका कमी होतो. जर मधुमेहाचा त्रास होत असेल, तर तो कमी करण्यासाठीही ओवा चांगला.