डोशाचे पीठ आहे? करा ५ चविष्ट पदार्थ! एकाच पीठाचे शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक पर्याय-खा मनसोक्त By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 12:25 PM 1 / 6डोशाचं पीठ उरलं असेल आणि पुन्हा त्याचे डोसे करून खाण्याची इच्छा नसेल तर हे काही वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता..2 / 6त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे पिझ्झा डोसा. यासाठी उत्तप्पाप्रमाणे जाड डोसा करा आणि त्यावर पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस टाकून सिमला मिरची, कांदा, स्वीट कॉर्न अशा वेगवेगळ्या भाज्या टाका..3 / 6डाेशाचं पीठ उरलं असेल तर तुम्ही त्याचे कांदा- टोमॅटो घालून उत्तप्पेही करू शकता.4 / 6डोशाच्या पीठामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून घाला. तसेच मुगाची डाळ भिजवून ती मिक्सरमधे वाटून टाका. त्यात थोडं बेसन पीठ आणि थोडा रवा टाका. आता हे मिश्रण थोडं घट्ट होईल. त्यामध्ये आलं- लसूण- मिरची पेस्ट घालून चवीनुसार मीठ टाका आणि त्याचे गरमागरम वडे तळा. सगळ्यांना खूप आवडतील.5 / 6डोशाच्या उरलेल्या पीठापासून छान चवदार अप्पेही तुम्ही करू शकता. 6 / 6डोसा- पनीर स्टफ हा पदार्थही तुम्ही करू शकता. यासाठी तुमच्या आवडीचे वेगवेगळे मसाले घालून पनीर फ्राय करून घ्या. त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाका आणि पातळ डोसा करून त्यात हे पनीरचे मिश्रण भरा. स्टफ डोसा असं थोडं वेगळं- हटके नावही तुम्ही त्याला देऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications