1 / 7पिठलं आणि भाकरी... सोबत तोंडी लावायला कच्चा कांदा, हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणच्याची एखादी फोड.. असा जेवणाचा मेन्यू असेल तर क्या बात है...2 / 7कांदा, लसूण यांची फोडणी घालून केलेलं बेसनाचं पिठलं सरसकट सगळ्याच घरांमध्ये केलं जातं. पण त्याशिवायही पिठल्याचे इतरही अनेक प्रकार आहेत. ते नेमके कोणते ते पाहूया.. 3 / 7काही भागात दही- दूधाचं पिठलं केलं जातं. नेहमीचं पिठलं करताना आपण बेसन पीठ पाण्यामध्ये कालवतो. पण दही- दुधाचं पिठलं करताना दही आणि दूध समप्रमाणात घेऊन त्यामध्ये बेसन पीठ कालवलं जातं.4 / 7शेवग्याच्या शेंगांचं पिठलंही काही ठिकाणी केल जातं. यासाठी शेवग्याच्या शेंगा पाण्यात मीठ घालून उकडल्या जातात. त्या पाण्यात मग थोडे आमसूल आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली जाते. आता या पाण्यात बेसन पीठ कालवून त्याचं पिठलं केलं की झालं तयार शेवग्याच्या शेंगांचं खमंग पिठलं..5 / 7कुळीथाचं पिठलं सुद्धा बरेच जण करतात. विशेषत: कोकण किंवा मुंबई भागात हे पिठलं बऱ्याच प्रमाणात खाल्लं जातं.6 / 7 काही ठिकाणी हरबऱ्याची डाळ पाण्यात भिजत घालून नंतर ती वाटली जाते आणि त्या वाटणाचं पिठलंही केलं जातं.7 / 7दाण्याचा कूट आणि बेसन हे सम प्रमाणात एकत्र घेऊन त्याला कांदा- लसणाची फोडणी देऊनही काही ठिकाणी पिठलं केलं जातं. त्याला दाण्याच्या कुटाचं पिठलं म्हणतात.