सायंकाळी खाता येतील असे ५ पदार्थ, १०० पेक्षा कमी कॅलरी-वजनही वाढणार नाही, खा बिंधास्त... Published:December 31, 2022 07:35 PM 2022-12-31T19:35:05+5:30 2022-12-31T19:53:24+5:30
5 Evening Tea Snacks That Are Under 100 Calories : संध्याकाळी दमून - भागून ऑफिसमधून आल्यावर आपल्याला जोरदार भूक लागलेली असते. मग आपण फ्रेश होऊन किचनच्या दिशेने धाव घेतो. दिवसभराचा थकवा आणि कंटाळा घालवायला वाफाळलेल्या चहाबरोबर समोर काहीतरी गरमागरम नाश्ता आला तर किती बरं होईल, असा विचार तुमच्या मनात येतो, पण..ते ‘गरमागरम काहीतरी’ आपोआप तयार होणार नसतं. आता हे काम कोण करणार या विचारानं तुम्हाला आणखीनच कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही किचनमधील सगळे डबे धुंडाळता आणि हाताला जे लागेल ते खायला सुरुवात करता. पण तुम्ही डाएटवर असाल किंवा कॅलरीजचा विचार करून खाणाऱ्यांपैकी असाल तर नक्की काय खावं आणि काय खाऊ नये असा प्रश्न तुमच्यासमोर असतो. आम्ही ५ अश्या पदार्थांची यादी देत आहोत की, जे खाऊन तुमचं पोटही भरेल आणि १०० पेक्षा जास्त कॅलरीज पण शरीरात जाणार नाही(5 Evening Tea Snacks That Are Under 100 Calories).
ओट्स कटलेट्स -
गरम - गरम चहासोबत तुम्ही ओट्स कटलेट्स खाऊ शकता. ओट्स आणि तुमच्या आवडत्या भाज्या बारीक कापून त्यांचे मिश्रण एकत्रित करून तुम्ही हे ओट्स कटलेट्स बनवू शकता. पुदिना चटणीसोबत तुम्ही हे कटलेट्स सर्व्ह करू शकता. या कटलेट्च्या एका पिसमधून तुम्हाला एकूण ८६ कॅलरीज मिळतात.
खाकरा -
खाकरा हा कुरकुरीत आणि हेल्दी स्नॅकचा प्रकार आहे. वाफाळत्या चहासोबत तुम्ही खाकरा खाऊ शकता. एका खाकऱ्यामधून तुम्हाला ८८ इतक्या कॅलरीज मिळतात.
भेळ पुरी -
कुरमुरे, चणे, शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, मिरचीची सुकी चटणी, बारीक शेव, पुरी या साहित्याने तुम्ही सुकी भेळ तयार करू शकता. एक मोठा बाऊल भरून जर तुम्ही भेळ घेतली तर यात एकूण ९० कॅलरीज असतात.
फ्लेवर्ड मखाणे -
भाजलेले मखाणे हा संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे. पुदिना, चिली, पेरी - पेरी, टोमॅटो, क्रीम अँड ओनियन अशा वेगवेगळ्या फ्लेवर्डमध्ये मखाणे उपलब्ध असतात. एक कप फ्लेवर्ड मखाण्यात सुमारे १०० कॅलरीज असतात.
पॉपकॉर्न -
पॉपकॉर्न हे फक्त मुव्ही बघताना खाऊन एन्जॉयमेंट करण्यासाठी नसतात तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. एक चमचा तेल किंवा बटरचा वापर करून हे पॉपकॉर्न तुम्ही फुलवू शकता. एक कप फुलवलेल्या पॉपकॉर्नमध्ये ३५ पेक्षा कमी कॅलरीज असतात.