Top 5 Cake: बघा भारतीयांना सगळ्यात जास्त कोणता केक आवडतो? तुमचा फेविरट कोणता?
Updated:December 25, 2024 14:54 IST2024-12-24T17:16:03+5:302024-12-25T14:54:22+5:30

कोणत्याही आनंदी प्रसंगाचं सेलिब्रेशन केक कापून करायचं हा ट्रेेण्ड आता आपल्याकडे खूप रुजला आहे. त्यामुळेच तर अगदी वाढदिवस असो, प्रमोशन असो किंवा मग साखरपुडा आणि लग्न असो... शेवटी केक कापला जातोच. आता तर ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्ताने केकला खूपच मागणी असते (5 most Popular Cake Flavour in India). त्यामुळेच बघा की बहुसंख्य भारतीय लोक अशा सेलिब्रेशनप्रसंगी कोणत्या फ्लेवरचा केक सगळ्यात जास्त मागवतात..(Top 5 Cake Flavour in India)
NFCI या हॉटेल मॅनेजमेंट संस्थेने काही दिवसांपुर्वी जो सर्व्हे केला हाेता त्यानुसार भारतात सगळ्यात जास्त मागणी असणारा केक आहे चॉकलेट केक.
दुसऱ्या क्रमांकावर आहे व्हॅनिला केक. चॉकलेट केकच्या खालोखाल व्हॅनिला केकला मागणी आहे.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो स्ट्रॉबेरी केक. ॲनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन्स डे अशाप्रसंगी हलक्याशा गुलाबी रंगाच्या स्ट्रॉबेरी केकला जास्त मागणी असते.
कॅरामल, व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट असं सगळं असणारा बटरस्कॉच केकही अनेक भारतीयांच्या आवडीचा आहे.
पाचव्या क्रमांकावर आहे रेड वेल्वेट केक. हा केससुद्धा ॲनिव्हर्सरी, लग्न, व्हॅलेंटाईन्स यानिमित्ताने सगळ्यात जास्त मागवला जातो.
आता रसमलाई केक, मँगो केक, गुलाबजामून केक असे खास इंडियन फ्लेवर असणारे केकही जास्त मागवले जात आहे.