कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

Published:December 19, 2023 09:12 AM2023-12-19T09:12:34+5:302023-12-19T16:36:23+5:30

कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

केक करणं हे अनेक जणींना खूप कठीण काम वाटतं. पण खरं तर केक तयार करणं हे कठीण नसून थोडंसं ट्रिकी काम आहे. थोडं काळजीपुर्वक लक्ष देऊन काही गोष्टी केल्या तर केक करण्याचा तुमचा प्लॅन कधीच फसणार नाही.

कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

आता ख्रिसमससाठी घरी केक करणार असाल तर या काही गोष्टी करायला विसरू नका.

कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केकसाठी तुम्ही ज्या कोणत्या पावडर, ड्रायफ्रुट्स वापरणार आहात, ते सर्व चांगल्या दर्जाचेच घ्या. कारण त्यामुळे केकमध्ये सगळ्या पदार्थांचा इसेंन्स खूप छान मिसळला जातो.

कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

केक उत्तम होण्यासाठी बेकिंग पावडर आणि बेकिंग साेडा यांचं प्रमाण एकदम अचूक असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते अगदी काटेकाेर टाका. तुमच्याकडे मेजरमेंट स्पून नसतील तर सगळ्यात आधी ते विकत आणा.

कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

केकसाठी लागणारं मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पावडर या सगळ्या पावडर गाळूनच घ्या.

कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

8केकचं बॅटर व्यवस्थित फेटलं जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खास वेळ देऊन ते फेटा. त्यात अजिबात हयगय नको. शिवाय बॅटर खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. यापैकी काहीही झालं तरी तुमचा केक बिघडू शकताे.

कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

केक बनविण्यासाठी गॅस नेहमी मंद ते मध्यम आचेवर असावा. ठराविक वेळाने केक किती बेक झाला हे टुथपिकनी कायम तपासत राहावे. यामुळे केक ओव्हर बेक होत नाही आणि कच्चाही राहात नाही.