कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 9:12 AM 1 / 7केक करणं हे अनेक जणींना खूप कठीण काम वाटतं. पण खरं तर केक तयार करणं हे कठीण नसून थोडंसं ट्रिकी काम आहे. थोडं काळजीपुर्वक लक्ष देऊन काही गोष्टी केल्या तर केक करण्याचा तुमचा प्लॅन कधीच फसणार नाही.2 / 7आता ख्रिसमससाठी घरी केक करणार असाल तर या काही गोष्टी करायला विसरू नका.3 / 7सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केकसाठी तुम्ही ज्या कोणत्या पावडर, ड्रायफ्रुट्स वापरणार आहात, ते सर्व चांगल्या दर्जाचेच घ्या. कारण त्यामुळे केकमध्ये सगळ्या पदार्थांचा इसेंन्स खूप छान मिसळला जातो.4 / 7केक उत्तम होण्यासाठी बेकिंग पावडर आणि बेकिंग साेडा यांचं प्रमाण एकदम अचूक असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते अगदी काटेकाेर टाका. तुमच्याकडे मेजरमेंट स्पून नसतील तर सगळ्यात आधी ते विकत आणा.5 / 7केकसाठी लागणारं मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पावडर या सगळ्या पावडर गाळूनच घ्या.6 / 78केकचं बॅटर व्यवस्थित फेटलं जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खास वेळ देऊन ते फेटा. त्यात अजिबात हयगय नको. शिवाय बॅटर खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. यापैकी काहीही झालं तरी तुमचा केक बिघडू शकताे. 7 / 7केक बनविण्यासाठी गॅस नेहमी मंद ते मध्यम आचेवर असावा. ठराविक वेळाने केक किती बेक झाला हे टुथपिकनी कायम तपासत राहावे. यामुळे केक ओव्हर बेक होत नाही आणि कच्चाही राहात नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications