रेस्टॉरंटसारखा कुरकुरीत मसाला डोसा घरी करायचा? ५ खास टिप्स- डोसा करण्यात व्हाल एक्सपर्ट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 5:42 PM 1 / 7मसाला डाेसा हा अनेकांचा आवडीचा मेन्यू.. गरमागरम भाजीसोबत कुरकुरीत क्रिस्पी डोसा खाण्याची मजाच काही वेगळी. पण आपण हा प्रयोग घरी करायला गेलो तर तो अनेकदा फसतो. (how to make masala dosa?)2 / 7कधी डोसा भाजी टाकल्याने अगदीच मऊ होऊन जातो तर कधी तव्यालाच चिटकून बसतो. मग तो जळका डोसा काढता काढता नाकी नऊ येतात. म्हणूनच आता साऊथ इंडियन स्टाईल कुरकुरीत मसाला डोसा घरी करणार असाल तर या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.. काही दिवसांतच तुम्ही डोसा करण्यात एकदम एक्सपर्ट होऊन जाल... (5 tips that will make you expert in making masala dosa)3 / 7सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डोसा करण्याचं पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ नको. ते चमच्यातून झरझर पडेल असं हवं.. (5 simple tricks and tips for making perfect masala dosa)4 / 7दुसरी गोष्ट म्हणजे डोसा नेहमी नॉनस्टिक पॅनवर करा. शिवाय तवा गरम होऊ द्या पण खूप कडक तापू देऊ नका. तवा तापल्यानंतर त्याला तेल लावा. नंतर त्यावर पाणी शिंपडा आणि पाण्याचे बुडबुडे तव्यावर असतानाच त्यावर डोसा करण्यासाठी पीठ टाका.5 / 7डोसा जेव्हा खालच्या बाजुने पुर्णपणे भाजून होईल, आणि तुम्ही तो जेव्हा तव्यावरून काढणार असाल त्याच्या थोडंसं आधी त्यावर भाजी टाका. नाहीतर डोसा भिजट होतो आणि त्याचा कुरकुरीतपणा निघून जातो. 6 / 7मसाला डोसा करताना त्यावर कधीच खूप भाजी घालू नका. भाजीचा पातळ थर घाला आणि तो ही मधल्या थोड्या जागेत. भाजी डोस्यावर पुर्णपणे पसरवून टाकू नका. 7 / 7डोसा नेहमी मध्यम आचेवर करा. गॅस मोठा किंवा खूप लहान ठेवू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications