वर्षभराचे मसाले बरण्यांत भरताय? लक्षात ठेवा ५ टिप्स- मसाल्यांची चव आणि सुगंध वर्षभर टिकेल
Updated:January 21, 2025 14:18 IST2025-01-21T12:22:15+5:302025-01-21T14:18:50+5:30

वर्षभराचे मसाले आपण एकदाच घरी करतो किंवा मग विकत आणून ठेवतो. पण काही जणींचा अनुभव असा आहे की मसाल्यांची चव आणि सुगंध हळूहळू कमी कमी होत जातो.
तुमचाही असाच अनुभव असेल तर मसाले साठवून ठेवताना या काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे मसाल्यांचा सुगंध, रंग आणि चवसुद्धा वर्षभर जशासतशीच राहील.
लाल तिखट तुम्ही ज्या बरणीमध्ये साठवून ठेवणार आहात त्या बरणीमध्ये तिखट भरल्यानंतर त्यावर एक कागद ठेवा आणि त्या कागदावर थोडे मीठ टाकून ठेवा. तिखट खराब होणार नाही.
काळा मसाला साठवून ठेवताना त्यामध्ये २- ४ लवंगा, दालचिनीचा एखादा तुकडा खोचून ठेवा. मसाल्याचा सुगंध जशासतसा राहील.
जीरे पावडरचा सुगंध आणि चव टिकून राहण्यासाठी जिरे पावडरमध्ये थोड्या लवंग घालून ठेवा. महिनोंमहिने जिरे पावडर खराब होणार नाही.
हळदीचा रंग आणि सुगंध टिकवून ठेवण्यासाठी हळदीच्या बरणीमध्ये थोडे तेजपान घालून ठेवावे.
धने खराब होऊ नयेत म्हणून ते आणल्यावर थोडे भाजून ठेवा. ६ महिने तरी धन्यांना काहीच होणार नाही.