Join us

तक्कू, लोणचं असे तेच ते पदार्थ सोडा- कैरीच्या ५ वेगळ्या रेसिपी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 18:09 IST

1 / 8
बाजारात हिरव्यागार कैऱ्या दिसू लागल्या की आपण त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून पाहात असतो..
2 / 8
कैरीचं इंस्टंट लोणचं, मेथांबा, तक्कू, साखरआंबा या रेसिपी तर आपल्याला माहितीच आहेत आणि आपण त्या नेहमीच करतो...
3 / 8
आता यापेक्षा काही एकदम वेगळ्या रेसिपी ट्राय करून पाहा.. कैरीचे हे पदार्थ जर तुमच्या जेवणात तोंडी लावायला असतील तर जेवणाची मजा जास्त वाढेल हे नक्की...
4 / 8
कैरीचं सलाड ट्राय करून पाहा.. यासाठी कैऱ्यांच्या अगदी पातळ, उभ्या फोडी करा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, कोथिंबीर असं सगळं कच्चं घाला. चाटमसाला, जिरेपूड, मीठ घालून त्याचा आस्वाद घ्या..
5 / 8
कैरीचं रायतं एकदा करून पाहा.. यामध्ये कांदा, दही, चवीनुसार मीठ आणि साखर, चाट मसाला असे पदार्थ घालू शकता..
6 / 8
कैरीच्या पातळ चकत्या करा.. त्यांना हळद, तिखट आणि मीठ लावा.. या फोडी उन्हात अगदी कुरकुरीत होईपर्यंत वाळू द्या.. ही कुरकुरीत कैरी जेवणात तोंडी लावा. जेवण मस्त होईल.
7 / 8
कैरीचा भात ही दक्षिण भारतातली अतिशय प्रसिद्ध रेसिपी. तिथे घरोघरी हा पदार्थ केला जातो. अशी एखादी रेसिपी तुम्हीही ट्राय करून पाहा..
8 / 8
मँगो चिली स्लश हा पदार्थही कधीतरी ट्राय करून पाहा.. यासाठी कैरीच्या फोडी, बर्फ, साखर, हिरवी मिरची, पुदिना हे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक फिरवून घ्यायचे. यानंतर ते गाळणीने गाळून घ्यायचे. जे गाळून आलेलं सरबत असेल त्यात आणखी थोडं थंड पाणी आणि चवीनुसार मीठ, काळं मीठ घालायचं. हे थोडंसं तिखट पण थंडगार सरबत छान लागतं..
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल